AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवा दुबईचे व्हायरल कुनाफा पिस्ता चॉकलेट

तुम्हालाही सोशल मिडियावर व्हायरल होत असलेली दुबईची प्रसिद्ध कुनाफा पिस्ता चॉकलेट खायचंय? तर आता तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण व्हायरल कुनाफा पिस्ता चॉकलेट बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊयात.

'या' सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवा दुबईचे व्हायरल कुनाफा पिस्ता चॉकलेट
Kunafa pistachio chocolat
| Edited By: | Updated on: Jul 07, 2026 | 4:20 PM
Share

सोशल मीडिया रील्सपासून ते फूड व्लॉग्सपर्यंत दुबई पिस्ता चॉकलेट सध्या जगभरात लोकप्रिय होत आहे. जेव्हा तुम्ही दुकान किंवा मॉलमध्ये जाऊन हा कुनाफा पिस्ता चॉकलेट खाता तेव्हा त्यात असलेले गडद हिरवे, कुरकुरीत पिस्ता आणि कुनाफाचे मिश्रण तोंडाला पाणी आणणारे असते. जर तुम्हालाही ही कुनाफा पिस्ता चॉकलेट बनवायचं असेल तर आजच्या लेखात आपण अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते जाणून घेऊयात.

कुनाफा पिस्ता चॉकलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

मिल्क किंवा डार्क चॉकलेट – 250 ग्रॅम

कुनाफा पेस्ट्री – 1 कप

पिस्ता क्रीम किंवा पिस्ता बटर – 1/2 कप

ताहिनी (तिळापासून बनवलेले एक बट्ट घट्ट लोणी (सीड बटर) किंवा पेस्ट) – 1 चमचा

बटर – 2 टेबलस्पून

व्हाईट चॉकलेट – 20 ग्रॅम

हिरवा फुड कलर– 1 चिमूटभर

सिलिकॉन चॉकलेट मोल्ड

कुनाफा पिस्ता चॉकलेट रेसिपी बनवण्याची कृती:

१. सर्वप्रथम व्हाईट चॉकलेट वितळवून त्यात हिरवा फुड कलरचा एक थेंब टाका. चमचा किंवा टूथपिकच्या साहाय्याने सिलिकॉन मोल्डमध्ये तयार व्हाईट चॉकलेटच्या टाका आणि ते ५ मिनिटे सेट होण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

2. आता मिल्क किंवा डार्क चॉकलेटचे लहान तुकडे करा आणि डबल बॉयलर किंवा मायक्रोवेव्हमध्ये दर 30-30 सेकंदांनी ढवळून वितळून घ्या.

3.वितळलेले चॉकलेट साच्यात ओता आणि वाटीसारखा थर तयार होईपर्यंत एकसारखे पसरवा. थर खूप जाड होऊ नये म्हणून जास्तीचे चॉकलेट काढून टाका. ते 10-15 मिनिटांसाठी सेट करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.

4. एका पॅनमध्ये बटर गरम करा. त्यात लहान तुकडे केलेली कुनाफा पेस्ट्री टाका.

5. मध्यम आचेवर सर्व बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. आता ही पेस्ट्री एका भांड्यात काढून थंड होऊ द्या.

6. थंड झालेल्या कुरकुरीत पेस्ट्री असलेल्या भांड्यात पिस्ता क्रीम आणि 1 चमचा ताहिनी पेस्ट टाका. सर्वकाही व्यवस्थित मिक्स करा.

7.आता फ्रीझरमधून सेट करायला ठेवलेला मोल्ड बाहेर काढा आणि त्यात तयार केलेले पिस्ता कुनाफाचे मिश्रण चमच्याने व्यवस्थित एकसारखे पसरवा. ते पूर्णपणे काठोकाठ भरू नका; थोडी जागा मोकळी सोडा.

8. आता उरलेले वितळलेले चॉकलेट त्यावर ओता आणि चांगले पसरवून घ्या.

9. चॉकलेट बार पूर्णपणे बंद झाल्यावर, त्यातील हवेचे बुडबुडे काढण्यासाठी मोल्डला हलकेच टॅप करा. ते कमीतकमी 30 ते 45 मिनिटांसाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

10. जेव्हा चॉकलेट पूर्णपणे घट्ट होईल, तेव्हा ते सिलिकॉनच्या मोल्डमधून हळुवारपणे बाहेर काढा. दुबई पिस्ता चॉकलेट तयार आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा