AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

New Year Rule Change : 1 जानेवारीपासून सामान्यांना झटका, नियमात मोठे बदल; खिशाला झळ बसणार?

नव्या वर्षात अनेक नियमांत बदल होणार आहे. या बदललेल्या नियमांमुळे तुमच्या खिशाला मोठी झळ बशू शकते. त्यामुळे हे बदललेले नियम काय आहेत, ते समजून घेणे गरजेचे आहे.

New Year Rule Change : 1 जानेवारीपासून सामान्यांना झटका, नियमात मोठे बदल; खिशाला झळ बसणार?
new rule change in new yearImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 31, 2025 | 4:55 PM
Share

New Year 2026 Rule Change : जगभरात सगळीकडे नव्या वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी चालू आहे. 2026 या साली करावयाचे संकल्प, नव्या वर्षाच्या कामाची यादी यासाठी आता लगबग चालू आहे. दरम्यान, तुम्ही ज्या पद्धतीने नव्या वर्षातील कामांची यादी केली आहे, त्याच पद्धतीने तुमच्या खिशावर झळ पाडणाऱ्या बदललेल्या नियमांबाबतही जाणून घेणे गरजेचे आहे. हे नियम जाणून न घेतल्यास तुमच्या तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. आधार-पॅन लिंकिंगपासून ते व्याजदरातील बदलापर्यंत बरेच महत्त्वाचे नियम आता बदलणार आहेत.

आधार-पॅन लिंकिंगचा नियम काय?

नियमानुसार आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 ही आही. त्याआधी तुम्ही आधार-पॅन लिंक न केल्यास तुमचे पॅन कार्ड बंद पडू शकते. त्यामुळे भविष्यात तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक करून घेणे गरजेचे आहे.

व्याज-दरात बदल

अनेक बँकांनी नव्या वर्षात व्याजदरात बदल करण्याचे ठरवले आहे. तसे संकेत या बँकांनी दिले आहेत. यामध्ये एफडी योजनांचाही समावेश होऊ शकतो. अर्थात हा व्याजदर कमी होणार की वाढणार हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे 1 जानेवारीनंतरच व्याजदरातील बदलामुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसणार की फायदा होणार? हे समजणार आहे.

एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात बदल

येत्या 1 जानेवारी रोजीपासून एलपीजी आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल होणार आहे. नव्या किमती 1 जानेवारी रोजी जाहीर होतील. विशेष म्हणजे 1 जानेवारी रोजीपासून विमानाच्या इंधनाचाही नवा भाव जाहीर केला जाईल. त्यामुळे विमानप्रवास महागणार की स्वस्त होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

क्रेडिट कार्डच्या नियमात बदल होणार

भारतीय बँका आपल्या क्रेडिट कार्डच्या नियमात बदल करणार आहेत. बँकिंग व्यवस्थत वेळोवेळी बदल होत राहतात. त्यामुळे नव्या वर्षात क्रेडिट कार्डच्या नियमातही बदल होण्याची शक्यता आहे. हे बदल काय असतील ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.