LPG Price Hike | 5 राज्यातील निवडणूक संपताच गॅसचे दर वाढले, अशा आहेत किंमती

LPG Price Hike | देशात एलपीजी सिलेंडरच्या भावात वाढ झाली आहे. गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने बजेट वाढणार आहे. पाच राज्यातील निवडणुकांची सर्वच रणधुमाळी थंडावली आहे. आता निकालाची प्रतिक्षा आहे. त्यापूर्वीच दरवाढ झाली. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने आजपासून ही दरवाढ लागू केली आहे.

LPG Price Hike | 5 राज्यातील निवडणूक संपताच गॅसचे दर वाढले, अशा आहेत किंमती
Follow us
| Updated on: Dec 01, 2023 | 9:54 AM

नवी दिल्ली | 1 डिसेंबर 2023 : देशातील पाच राज्यांतील निवडणुका संपल्या आहेत. आता निकालाची प्रतिक्षा आहे. त्यातच एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. अर्थात याची झळ थेट सर्वसामान्यांच्या किचनला बसणार नाही. कारण ही दरवाढ 19 किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक गॅससंदर्भात करण्यात आली आहे. कर्मशियल गॅसमध्ये 21 रुपये प्रति सिलेंडरची वाढ झाली आहे. आज 1 डिसेंबर 2023 रोजी देशाची राजधानी दिल्लीत कमर्शियल गॅस सिलेंडर 1796.50 रुपये तर गेल्या महिन्यात एलपीजी गॅसचे भाव 1775.50 रुपये प्रति सिलेंडर असा झाले.

घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ नाही

घरगुती ग्राहकांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. सबसिडी असलेल्या 14.2 किलोग्रम घरगुती गॅसच्या किंमतीत कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे किचनचे बजेट वाढणार नाही. ग्राहकांच्या खिशावर कोणतीही परिणाम होणार नाही. गेल्या महिन्यात घरगुती गॅसच्या किंमतीत कपात करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

गेल्या महिन्यात 100 रुपयांची दरवाढ

गेल्या महिन्याच्या पहिल्या तारखेला 1 नोव्हेंबर रोजी एलपीजी सिलेंडरचे दर 100 रुपयांनी वाढले होते. 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजीच्या भावात वाढ करण्यात आली होती. सणासुदीच्या काळातच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली होती. सध्या ग्राहकांना हॉटेलिंगसाठी जादा पैसा मोजावा लागत आहे.

भावात चढउतार

  • 1 ऑक्टोबर रोजी एलपीजीच्या किंमती 1731.50 रुपये होत्या
  • 1 नोव्हेंबर रोजी 101.50 रुपयांनी दर वाढले. 1833 रुपये प्रति सिलेंडरवर किंमती पोहचल्या
  • 16 नोव्हेंबर रोजी व्यावसायिक गॅसच्या किंमतीत 57.05 रुपयांची कपात झाली.
  • हा भाव 1775.50 रुपयांवर आला होता. सणासुदीच्या अखेरीस हा दिलासा मिळाला होता.

दरवाढीचा असा होईल परिणाम

व्यावसायिक गॅस महागल्याचा थेट परिणाम खाद्यउद्योगांवर दिसून येतो. हॉटेलिंग आणि फूड डिलिव्हरी महागली आहे. रेस्टॉरंटमध्ये पण खाद्यपदार्थ्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. सर्वसामान्य लोकांसाठी बाहेरील खाद्यपदार्थ महागले आहेत.

घरगुती सिलेंडरची किंमत

घरगुती सिलेंडरचे ग्राहक इतके नशीबवान नाहीत. गेल्या काही वर्षांपासून सिलेंडरचे भाव सातत्याने वाढत आहे. कधीकाळी 500 रुपयांच्या आत मिळणारे सिलेंडर आता एक हजारांच्या घरात मिळत आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने 200 रुपयांची सबसिडी दिली होती. त्यानंतर दिल्लीत 14.2 किलोग्रॅम सिलेंडरची किंमत 903 रुपये, कोलकत्तामध्ये 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईत हा भाव 918.50 रुपये होता.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.