मादुरो यांना अटक होताच काही तासातच हा व्यक्ती झाला करोडपती, जगातील हा भाग्यवंत कोण ?; काय आहे भानगड?
अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक करताच एका व्यक्तीचे नशीब फळफळले. राजकीय भविष्यवाणी बाजारात मादुरो पदच्युत होण्यावर लावलेल्या सट्ट्यामुळे त्याने अवघ्या काही तासांत 27 लाख रुपयांवरून 3.9 कोटी रुपये कमावले. ही घटना जागतिक राजकारण आणि डिजिटल ट्रेडिंग मार्केटमधील अनपेक्षित लाभाचे उत्तम उदाहरण आहे.

व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो (Nicolas Maduro) यांना अमेरिकेने ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या पत्नीलाही अमेरिकेने (USA) ताब्यात घेतलं आहे. मादुरो यांच्या अटकेने केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणच बदललेलं नाही. तर एका ट्रेडरचं नशिबच फळफळलं आहे. अवघ्या काही तासात ही व्यक्ती करोडपती झाली आहे. त्याने 27 लाख रुपये लावले आणि काही तासातच त्याला 3.9 कोटी रुपये मिळाले. म्हणजे चार कोटी रुपयांचा नफा झाला. प्रिडिक्शन मार्केटमधील हा सर्वात मोठा आणि आजवरचा सर्वात चर्चित सौदा असल्याचं मानलं जात आहे.
अमेरिकेने मादुरो यांना अटक केल्याची पुष्टी होताच या व्यक्तीला जबरदस्त रिटर्न मिळाले. मादुरो यांना सत्तेतून हटवण्यावरून हा सट्टा लागलेला होता. मादुरो हे सत्तेतून दूर जातील याची कुणालाही कल्पना नव्हती. कुणी तशी भविष्यवाणी केली असती तर भविष्यवाणी करणाऱ्याला वेड्यात काढलं गेलं असतं. अशावेळी या व्यक्तीने कष्टाचे 27 लाख रुपये पणाला लावले. पण नशिब बलवत्तर होतं म्हणून त्याला कोटींचा फायदा झाला.
भविष्यवाणी खरी ठरली
या ट्रेडरने एका राजकीय प्रेडिक्शन मार्केटमध्ये एक सट्टा लावला होता. जानेवारी 2026च्या अखेरपर्यंत निकोलस मादुरो हे सत्तेत राहणार नाहीत, असा अंदाज त्याने वर्तवला होता. त्यावेळी या सट्ट्याची प्राईज अत्यंत कमी होती. कारण मादुरो यांची सत्तेवरील पकड मजबूत असल्याचं मानलं जात होतं. तसेच कोणत्याही प्रकारे विदेशी सैन्य कारवाई होईल अशी चिन्हे नव्हते.
पण 3 जानेवारी 2026 रोजी अमेरिकेने मादुरो आणि त्यांच्या बायकोला ताब्यात घेतल्याची घोषणा केली. त्यामुळे या अचानक या व्यक्तीच्या सट्ट्याला भाव आला. अवघ्या काही तासात 27 लाखाची गुंतवणूक 3.9 कोटी रुपयांवर गेली. त्यामुळे या व्यक्तीचं नशिब एकदमच फळफळलं आहे. पण या व्यक्तीचं नाव गुप्त ठेवण्यात आलं आहे.
प्रेडिक्शन मार्केट्सचं काम कसं चालतं?
प्रेडिक्शन मार्केट्समध्ये भविष्यातील घटनांवर सट्टा लावला जातो. हा एक डीजिटल प्लॅटफॉर्म आहे. अंदाज वर्तवलेली घटना त्या काळात घडली तर सट्ट्याची व्हॅल्यू वाढते. पण जर त्या काळात घटना नाही घडली तर जेवढा पैसा लावला तेवढा पैसा डुबतो. या मार्केट्समध्ये राजकीय बदल, निवडणूक निकाल, युद्ध, आर्थिक निर्णय आणि मोठ्या वैश्विक घटनांचा समावेश होतो. मादुरो सारख्यांच्या अटकेची अनिश्चित बातमी खरी ठरते तेव्हा मार्केट वेगाने वाढते.
राजकीय घटना आणि पैसा
या घटनेमुळे एक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे वैश्विक राजकारण केवळ सरकार किंवा कूटनीतीपर्यंतच मर्यादित नाही. तर आर्थिक बाजार आणि डीजिटल ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरही त्याचा थेट परिणाम होतो. मादुरोंच्या अटकेमुळे भू राजकीय घटनांमुळे काही लोकांना अप्रत्यक्षपणे लाभ मिळू शकतो हे यातून दिसून येतं. पण त्यासाठीची जोखीमही तेवढीच मोठी असते.
