AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेअर बाजारातील डुबकीने गुंतवणूकदार कंगाल, 46 दिवसात 33 लाख कोटींचा फटका, महाकुंभ पर्वात स्टॉक मार्केटची अशी झाली दशा

Mahakumbha Share Market Crash : महाकुंभ आणि शेअर बाजाराचे अनोखे नाते समोर आले आहे. वर्ष 2004 पासून ते आतापर्यंत 7 वेळा स्टॉक मार्केटमध्ये घसरण दिसली आहे. तेव्हापासून तीनदा बाजारात मोठी घसरण दिसून आली आहे.

शेअर बाजारातील डुबकीने गुंतवणूकदार कंगाल, 46 दिवसात 33 लाख कोटींचा फटका, महाकुंभ पर्वात स्टॉक मार्केटची अशी झाली दशा
शेअर बाजार
| Updated on: Feb 26, 2025 | 11:05 AM
Share

ज्या दिवशी महाकुंभाचा शंखनाद झाला. त्याच दिवशी सॅमको सिक्युरिटीजने एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालातून एक जबरदस्त विश्लेषण समोर आले आहे. त्यानुसार गेल्या 20 वर्षात 6 वेळा कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना अमृताचा, धनाचा कुंभ दिला नाही तर जे आहे ते साफ केले. कुंभ मेळ्या दरम्यान गुंतवणूकदार बाजारात कंगाल झाल्याचे समोर आले आहे.

महाकुंभ काळात 3.50 टक्क्यांची घसरण

आकडेवारीनुसार, शेअर बाजारात महाकुंभ काळात 3.50 टक्क्यांहून अधिकची घसरण दिसली. महाकुंभाच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजार बंद आहे. पण त्यापूर्वी शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना फटका दिला आहे. गुंतवणूकदारांचे 33 लाख कोटीहून अधिक रुपये बुडाले आहेत. या त्सुनामीमुळे गुंतवणूकदार बेहाल आहेत.

सेन्सेक्समध्ये मोठी पडझड

महाकुंभ सुरु होण्यापूर्वी म्हणजे 10 जानेवारी रोजी शेअर बाजार बंद होता. त्यादिवशी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 77,378.91 अंकावर होता. तर महाकुंभ सुरू झाल्यापासून आता सेन्सेक्स 74,602.12 अंकापर्यंत घसरला आहे. म्हणजे सेन्सेक्समध्ये 2,776.79 अंकांची घसरण झाली आहे. सेन्सेक्सने गुंतवणूकदारांचे 3.59 टक्के नुकसान केले आहे. ही सातवी वेळ आहे, जेव्हा सेन्सेक्समध्ये घसरण दिसली. वर्ष 2021 मध्ये सेन्सेक्समध्ये 4 टक्क्यांहून अधिकची घसरण झाली होती.

निफ्टी पण गडगड लोळला

दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख निर्देशांक निफ्टीमध्ये पण मोठी पडझड दिसून आली. आकडेवारीनुसार, या 10 जानेवारी रोजी निफ्टी 23,381.60 अंकावर होता. तर या 25 फेब्रुवारी रोजी निफ्टी 22,547.55 अंकापर्यंत घसरला. म्हणजे निफ्टीत 834.05 अंकांची घसरण दिसून आली आहे. निफ्टीने गुंतवणूकदारांचे 3.57 टक्के नुकसान केले आहे.

सातव्या वेळा शेअर बाजारात घसरण

महाकुंभादरम्यान शेअर बाजारात सलग सातव्या वेळा घसरण दिसली. वर्ष 2004 मध्ये सेन्सेक्स महाकुंभादरम्यान 3.3 टक्के घसरण झाली. 2010 मध्ये 1.2 टक्के, 2013 दरम्यान 1.3 टक्के, 2015 मध्ये सर्वाधिक 8.3 टक्के, 2016 मध्ये 2.4 टक्के आणि वर्ष 2021 मध्ये 4.2 टक्के घसरण दिसली होती. तर यावेळी महाकुंभादरम्यान वर्ष 2025 मध्ये सेसेंक्स 3.5 टक्क्यांहून घसरला आहे. शेअर बाजाराच्या या रौद्र रुपामुळे बाजारात आलेले हौसे, नवसे आणि गवसे यांनी पळ काढला आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.