बँकांच्या वेळापत्रकापासून ते व्याजदरापर्यंतचे नवे नियम आजपासून लागू

| Updated on: Nov 01, 2019 | 11:56 AM

देशभरात बँकाच्या अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. हे बदल आजपासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून लागू होतील. याचा परिणाम सरळ सामान्य जनतेच्या खिशावर होणार आहे (Bank rules changed). महाराष्ट्र बँकेच्या वेळापत्रापासून ते भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) ठेवींवरील व्याजाच्या दरापर्यंत अनेक नियम बदलण्यात आले आहेत

बँकांच्या वेळापत्रकापासून ते व्याजदरापर्यंतचे नवे नियम आजपासून लागू
Follow us on

नवी दिल्ली : देशभरात बँकाच्या अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. हे बदल आजपासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून लागू होतील. याचा परिणाम सरळ सामान्य जनतेच्या खिशावर होणार आहे (Bank rules changed). महाराष्ट्र बँकेच्या वेळापत्रापासून ते भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) ठेवींवरील व्याजाच्या दरापर्यंत अनेक नियम बदलण्यात आले आहेत (Bank rules changed ). त्याशिवाय, ग्राहक आणि व्यापाऱ्यांकडून आकारण्यात येणारा व्यापारी सवलत दर (MDR) मात्र आकारला जाणार नाही.

महाराष्ट्रात बँकाचा कामकाजाचा वेळ बदलणार

राज्यातील सर्वच पब्लिक सेक्टर बँकांच्या (PSU) कामकाजाच्या वेळेत 1 नोव्हेंबरपासून बदल होणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार निवासी क्षेत्रांमध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत बँका सुरु राहातील. त्याशिवाय, आर्थिक कामकाज हे सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होईल. तर काही भागांमध्ये बँकांच्या कामकाजाचा वेळ सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

एसबीआयच्या ठेवींवरील व्याजाच्या दरात बदल

1 नोव्हेंबरपासून ठेवींवरील व्याजाच्या दरातही बदल होणार आहे. या बदलावानंतर एसबीआय ग्राहकांना 1 लाखांच्या ठेवीवर 3.50 नाही तर 3.25 व्याजदरानुसार व्याज देईल. पण, 1 लाखापेक्षा जास्त रक्कम जमा करणाऱ्यांना जुन्या व्याजदराप्रमाणेच व्याज मिळेल.

MDR घेतला जाणार नाही

वित्त मंत्रालयाने आजपासून पेमेंट नियमांध्येही बदल केले आहेत. हे बदल 50 कोटींपेक्षा जास्त रुपयांची उलाढाल करणाऱ्या व्यावसायिकांवर लागू होईल. या बदलानंतर डिजीटल पेमेंट अनिवार्य असेल. मात्र, यामध्ये एक सूटही देण्यात आली आहे. या नव्या नियमांनुसार, व्यावसायिकांकडून एमडीआर आकारला जाणार नाही.