Corona Crisisमध्ये ही कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना देणार 1-1 लाखांचा बंपर बोनस

मायक्रोसॉफ्टच्या मुख्य पीपल्स ऑफिसरने (CPO) 8 जुलै रोजी हा बोनस जाहीर केला. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात बोनस दिला जाणार आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणाऱ्या जगातील प्रत्येक कर्मचाऱ्याला याचा फायदा होईल.

Corona Crisisमध्ये ही कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना देणार 1-1 लाखांचा बंपर बोनस
service staff
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 7:35 PM

नवी दिल्लीः कोरोनामुळे अर्थव्यवस्था आणि जनता दोघेही उद्ध्वस्त झालेत. संकटाच्या या काळात बऱ्याच कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांच्या बचावासाठी पुढे आल्यात. कर्मचार्‍यांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्यात, जेणेकरून त्यांना मदत करता यावी. यासंदर्भात ग्लोबल टेक दिग्गज मायक्रोसॉफ्टने आपल्या कर्मचार्‍यांना मोठा बोनस जाहीर केलाय. द वर्जच्या अहवालानुसार, मायक्रोसॉफ्टने आपल्या कर्मचार्‍यांना 1500-1500 डॉलर म्हणजेच एक लाखाहून अधिक रुपयांचा स्वतंत्र बोनस देण्याचा निर्णय घेतलाय. मायक्रोसॉफ्टच्या मुख्य पीपल्स ऑफिसरने (CPO) 8 जुलै रोजी हा बोनस जाहीर केला. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात बोनस दिला जाणार आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणाऱ्या जगातील प्रत्येक कर्मचाऱ्याला याचा फायदा होईल. (Microsoft Employees Will Get 1500 Dollar Bonus Amid Corona Crisis)

1500 कोटी बोनस म्हणून वितरीत केले जातील

बोनस म्हणून मायक्रोसॉफ्टला वेगळे 200 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 1500 कोटी रुपये द्यावे लागतील. याचा फायदा कंपनीच्या प्रतिमेलाही मोठ्या प्रमाणात होईल. कंपनीमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करणारे कर्मचारी आणि मायक्रोसॉफ्टच्या गिटहब, लिंक्डइन आणि झेनिमॅक्स यांसारख्या सहाय्यक कंपन्यांच्या कर्मचार्‍यांना या बोनसचा लाभ मिळणार नाही. सीएनबीसीच्या अहवालानुसार मायक्रोसॉफ्टकडे रोख राखीव, इक्विटी आणि 125 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे.

बोनस संबंधित ही आहे अट

मायक्रोसॉफ्टमध्ये जागतिक स्तरावर 1 लाख 75 हजार 508 कामगार काम करतात. उपाध्यक्षपदावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यासंदर्भात एक अट देखील आहे. लाभार्थी कर्मचार्‍यात सामील होणे 31 मार्च 2021 पूर्वीचे असावे.

LIC च्या ‘या’ योजनेमुळे निवृत्तीनंतर पैशांची अडचण होणार नाही

तुमच्या सेवानिवृत्तीनंतरच्या गरजा भागवण्यासाठी एलआयसीची जीवनशांती ही एक लाभदायक योजना आहे. यात दोन पेन्शन पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये पहिली त्वरित एन्युइटी आणि दुसरी डिफर्ड एन्युइटी आहे. या योजनेत भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि सेवानिवृत्तीनंतर पैशांची कमतरता भागविण्यासाठी दरमहा एक निश्चित रक्कम दिली जाते. एलआयसीची जीवनशांती योजना ही एक नॉन-लिंक्ड योजना आहे. यामध्ये तुम्ही प्रत्येक महिन्यात एकमुखी रक्कम म्हणजेच एकदाच गुंतवणूक करून पेन्शन मिळवू शकता. आपण योजनेंतर्गत त्वरित किंवा नंतर पेन्शन सुविधा घेऊ शकता. ज्यांना नंतर पेन्शन घ्यायची आहे, त्यांनाही 5, 10, 15 किंवा 20 वर्षांनंतर हा पर्याय मिळेल.

संबंधित बातम्या

PNB ची धमाकेदार ऑफर; आपल्या इच्छेनुसार डेबिट कार्ड खर्च मर्यादा सेट करा, अशी होणार बचत

Gold Silver Price Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदीत मोठी घसरण, पटापट तपासा

Microsoft Employees Will Get 1500 Dollar Bonus Amid Corona Crisis

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.