Microsoft : ज्या कंपनीमुळे जगात झाला हाहाकार, तिला एका झटक्यात इतक्या हजार कोटींचे नुकसान

Microsoft Outages : अमेरिकन सायबर सिक्युरिटी कंपनी क्राऊडस्ट्राईकने काल जगाला झटका दिला होता. आज कंपनीला जगाने झटका दिला. शुक्रवारी कंपनीच्या शेअरमध्ये 11 टक्क्यांहून अधिकची घसरण नोंदविण्यात आली. कंपनीमुळे जगातील अनेक कंपन्यांना मोठा फटका बसला.

Microsoft : ज्या कंपनीमुळे जगात झाला हाहाकार, तिला एका झटक्यात इतक्या हजार कोटींचे नुकसान
Crowdstirke
Follow us
| Updated on: Jul 20, 2024 | 5:01 PM

अमेरिकन सायबर सिक्युरिटी कंपनी क्राऊडस्ट्राईक शुक्रवारी एकदम चर्चेत आली. या कंपनीच्या खराब सॉफ्टवेअर अपडेटमुळे जगात हाहाकार उडाला. जगातील अनेक कंपन्यांचे, विमान वाहतूक, दैनंदिन व्यवहार ठप्प पडले. जवळपास 15 तास मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर बंद होते. त्यामुळे बँका, टीव्ही चॅनल आणि जगातील अनेक शेअर बाजारावर विपरीत परिणाम झाला. त्यांचा वेग मंदावला. काहींचे कार्य पूर्णपणे ठप्प झाले. आता परिस्थिती हळूहळू निवळली आहे.

जगात हाहाकार माजविणाऱ्या अमेरिकन सायबर सिक्युरिटी कंपनी क्राऊडस्ट्राईकला सुद्धा तगडा झटका बसला. शुक्रवारी कंपनीच्या शेअरमध्ये 11 टक्क्यांहून अधिकची घसरण दिसून आली. सार्वजनिक सेवा बंद झाल्या. अनेक विमानं रद्द करण्यात आली. काही टीव्ही चॅन्सलचे प्रसारण खंडित झाले.

73,000 कोटी बुडाले

हे सुद्धा वाचा

या ढिसाळ कारभाराची कंपनीला लागलीच परतफेड करण्यात आली. शेअर बाजारात कंपनीचा शेअर दणकावून आपटला. क्राऊडस्ट्राईकचे मार्केट कॅप या गडबडी अगोदर 83 बिलियन डॉलरवर पोहचले होते. या झटक्यामुळे मार्केट कॅप 8.8 अब्ज डॉलरने घसरले. एका झटक्यात कंपनीला जवळपास 73 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. ही कंपनी जगभरात सायबर सुरक्षा पोहचवते. या कंपनीचे जगात 30 हजारांहून मोठे ग्राहक आहेत.

गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत

कालच्या प्रकाराने ग्राहक आणि गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास डळमळीत झाला आहे. ही कंपनी आतापर्यंत सायबर सुरक्षेच्या दृष्टीने लोकप्रिय होती. या कंपनीचा शेअर गेल्यावर्षी दुप्पट झाला होता. पण या अप्रिय घटनेमुळे कंपनीची बाजारातील प्रतिष्ठा घटली आहे. त्याचा कंपनीला शुक्रवारी फटका बसला. शेअर धडामधूम आपटला.

आता पुढे काय होईल परिणाम?

वेडबश सिक्युरिटीजचे विश्लेषक डॅन इवेस यांच्या मते, क्राऊडस्ट्राईकला हा मोठा झटका आहे. तिच्या शेअरवर याचे परिणाम दिसून येईल. ही घटना तांत्रिक बिघाडामुळे घडली आहे. जर यंत्रणा हॅक झाली असेल तर ही चिंतेची बाब ठरु शकते. जेपी मॉर्गनच्या मते, सध्या ग्राहकांनी तात्कालीन प्रतिक्रिया नोंदवली आहे. थोड्याच दिवसात परिस्थिती पूर्वपदावर येईल. पण तोपर्यंत कंपनीचे आणि पर्यायाने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?.
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी...
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी....
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या....
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर.
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?.
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....