AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुकेश अंबानी यांचा 8000 कोटींचा खेळ, कोका-पेप्सीला बसणार धक्का

कोका-कोला आणि पेप्सीला भारतातून आव्हान मिळणार आहे. मुकेश अंबानी यांच्या कॅम्पा कोलाकडून हे आव्हन मिळणार आहे. रिलायन्स कंज्झूमर प्रोडक्ट्स लिमिटेडने सॉफ्ट ड्रिंक उद्योगात 8000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुकेश अंबानी यांचा 8000 कोटींचा खेळ, कोका-पेप्सीला बसणार धक्का
Mukesh Ambani
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 19, 2025 | 9:50 AM
Share

Campa Cola 2.0: कोका-कोला आणि पेप्सी या आंतरराष्ट्रीय दिग्गज कंपन्यांसाठी भारतात धोक्याची घंटा वाजली आहे. भारतामधील सर्वात मोठे उद्योजक मुकेश अंबानी यांच्याकडून या कंपन्यांना धोका निर्माण झाला आहे. मुकेश अंबानी यांनी कोका-कोला आणि पेप्सीच्या विरोधात भारतात कॅम्पा कोला रिलॉन्च केले. त्यामुळे कोका-कोला आणि पेप्सीच्या मार्केटला मोठा धक्का बसला आहे. आता मुकेश अंबानी कोला आणि पेप्सीला झटका देण्यासाठी 8000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. थोडक्यात, अंबानी यांच्या रिलायन्स कंझ्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेडने भारतातील 60,000 कोटी रुपयांच्या सॉफ्ट ड्रिंक मार्केटवर लक्ष केंद्रीत केले आहे.

अंबानी यांचा 8000 कोटींचा प्लॅन काय?

कोका-कोला आणि पेप्सीला भारतातून आव्हान मिळणार आहे. मुकेश अंबानी यांच्या कॅम्पा कोलाकडून हे आव्हन मिळणार आहे. रिलायन्स कंज्झूमर प्रोडक्ट्स लिमिटेडने सॉफ्ट ड्रिंक उद्योगात 8000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील 12 ते 15 महिन्यात कॅम्पा ब्रँडसाठी 6,000 ते 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. कंपनीचा हा सर्वात मोठा कॅपेक्स (capital expenditure) प्लॅन आहे. त्याचा सर्वात मोठा फटका कोका-कोला आणि पेप्सीला बसणार आहे.

प्राइस वॉरचा झटका

RCPL ने आपल्या सॉफ्ट ड्रिंक्स, स्पोर्ट्स ड्रिंक, हायड्रेशन आणि ज्यूससारख्या उत्पादनाच्या किंमती कोका-कोला, पेप्सीको, टाटा कंझ्युमर आणि डाबरसारख्या सॉफ्ट ड्रिंक्सच्या तुलनेत 20-40% कमी ठेवल्या आहेत. थिंक टॅक आयसीआरआयईआरनुसार, भारताचा सॉफ्ट ड्रिंक्स उद्योग ₹67,000 कोटी रुपयांचा आहे. तसेच 2030 पर्यंत 1.47 लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या मार्केटमध्ये मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स कंझ्यूमर प्रॉडक्ट्स लिमिटेडनेही उडी घेतली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (FY25) मध्ये रियायन्स कंझ्यूमरने 11,500 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. देशातील 10 लाखांपेक्षा जास्त दुकानदारांपर्यंत हे प्रॉडक्ट पोहचले आहे.

कोका-कोला आणि पेप्सीला झटका?

भारताचे सॉफ्ट ड्रिंक बाजार जवळपास 60,000 कोटी रुपयांचा आहे. त्यावर कोका-कोला आणि पेप्सी वर्चस्व होते. परंतु रिलायन्ससारखे सुपर डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क आणि कमी किंमती यामुळे या प्रॉडक्टला फटका बसू लागला आहे. रिलायन्सची ग्रोथ वेगाने होत आहे. यामुळे मुकेश अंबानी यांचा कॅम्पा कोला लवकरच भारतीय सॉफ्ट ड्रिंक बाजारावर वर्चस्व मिळवण्याची शक्यता आहे.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...