मुकेश अंबानी यांना 0 वेतन, सहा वर्षांपासून एक रुपयाही पगार घेतला नाही, मग कमाई कशी होते ?

अंबानी यांची तिन्ही मुले इशा, आकाश आणि अनंत यांचा समावेश ऑक्टोबर २०२३ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात केला आहे. मात्र,यासाठी त्यांना वेतन मिळालेले नाही. त्यांना केवळ बैठकीचे शुल्क आणि नफ्यावरील कमिशन देण्यात आले आहे.

मुकेश अंबानी यांना 0 वेतन, सहा वर्षांपासून एक रुपयाही पगार घेतला नाही, मग कमाई कशी होते ?
Mukesh Ambani
| Updated on: May 28, 2026 | 6:51 PM

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी त्यांच्या कंपनीत यंदाही एक छदामही पगार घेतला नाही. हे लागोपाठ सहावे वर्षे आहे की मुकेश अंबानी यांनी एक रुपयाही पगार घेतलेला नाही. कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार मुकेश अंबानी यांनी आर्थिक वर्षे २०२५-२६ मध्ये वेतन, भत्ते, सुविधा आणि सेवानिवृत्तीचा लाभाच्या रुपात कोणतीही रक्कम स्वीकारलेली नाही, मुकेश अंबानी यांच्या कमाईचा मुख्य स्रोत डिव्हीडन्ड राहिलेला आहे.

या आधी मुकेश अंबानी यांनी आर्थिक वर्ष २००८-०९ ते २०१९-२० पर्यंत आपल्या वार्षिक मोबदल्याला १५ कोटीपर्यंत मर्यादित ठेवले होते. यानंतरच्या आर्थिक वर्षात २०२०-२१ मध्ये त्यांनी कोव्हिड – १९ साथीमुळे स्वच्छेने आपले वेतन घेतले नव्हते.

अखेर हा निर्णय का घेतला ?

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख असलेले मुकेश अंबानी यांनी हा निर्णय यासाठी घेतला होता की जोपर्यंत कंपनी आणि त्याचा संपूर्ण व्यवसाय आपल्या पूर्ण कमाई क्षमतेवर परत येत नाही, तोपर्यंत ते वेतन घेणार नाहीत. त्यांनी पूर्णपणे स्वैच्छीक रुपाने आपल्या या निर्णयाला आर्थिक वर्षे २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४,२०२४-२५ आणि आता २०२५-२६ मध्ये ही जारी राहणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्षात २०२५-२६ मध्ये ९५,७५४ कोटी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वात जास्त नफा कमावला होता आणि कंपनीचे बाजारमुल्य १८.१९ लाख कोटी रुपये राहिले.

डिव्हीडन्डने ९.६६ कोटीची कमाई

सुमारे १०० अब्ज डॉलरच्या नेटवर्थसह जगातील २१ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या कमाईचा मुख्य स्रोत लांभाश उत्पन्न आहे. रिलायन्समध्ये त्यांची थेटपणे १.६१ कोटी शेअर्स आहेत. ज्यामुळे त्यांना आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी घोषीत सहा रुपये प्रति शेअरच्या लाभांशच्या आधारावर ९.६६ कोटी रुपयांचा लाभांश उत्पन्न मिळालेले आहे. अंबानी यांचा चुलत भाऊ निखिल आणि हितल मेसवाणी यांचा मोबदला प्रत्येकी २५ कोटी रुपयांवर स्थिर राहिला. यात वेतन, भत्ते, सेवानिवृत्ती लाभ आणि नफ्यावरील कमिशनचा समावेश आहे.कार्यकारी संचालक पी.एम. एस. प्रसाद यांचा मोबदला आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये वाढून २०.५८ कोटी रुपये झाला असून तो २०२४-२५ मध्ये १९.९६ कोटी रुपये होता.

मुलांनाही वेतन मिळाले नाही

अंबानी यांची तिन्ही मुले इशा, आकाश आणि अनंत यांना ऑक्टोबर २०२३ मध्ये संचालक मंडळात सामील केले होते. मात्र, यासाठी त्यांना कोणतेही वेतन दिलेले नाही. त्यांना केवळ बैठक शुल्क आणि नफ्यावरील कमिशन देण्यात आले. आकाश आणि इशा यांना प्रत्येकी पाच रुपये बैठक शुल्क आणि अडीच कोटी रुपये कमिशन मिळाले आहे.
अंबानी १९७७ पासून रिलायन्सच्या संचालक मंडळात आहेत. जुलै, २००२ मध्ये समुह संस्थापक धीरुभाई अंबानी यांच्या निधनानंतर त्यांना कंपनीचे चेअरमन बनवले होते. वर्ष २०२३ मध्ये एप्रिल २०२९ पर्यंत पाच वर्षांसाठी पुन्हा रिलायन्सचे प्रमुख म्हणून नियुक्त केले गेले. या दरम्यान देखील त्यांनी वेतन न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

Follow Us