AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2027 मध्ये खेळणार का? सीएसके व्यवस्थापनाने दिली अशी माहिती

आयपीएल स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीची निवृत्ती एक गूढ राहिलं आहे. गेल्या अनेक पर्वापासून महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या शेकडो बातम्या आल्या असतील. मात्र या सर्व बातम्यांना धोनीने प्रत्येक वेळी केराची टोपली दाखवली आहे. यंदाही धोनीने निवृत्ती घेतली नाही, मग पुढच्या पर्वात खेळणार की नाही असा प्रश्न आहे.

महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2027 मध्ये खेळणार का? सीएसके व्यवस्थापनाने दिली अशी माहिती
महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2027 मध्ये खेळणार का? सीएसके व्यवस्थापनाने दिली अशी माहितीImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 28, 2026 | 7:38 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धा जेतेपदासाठी आता दोन सामन्यांचा खेळ शिल्लक राहिला आहे. आतापर्यंत सात संघाचा स्पर्धेतील प्रवास संपला असून जेतेपदासाठी आरसीबी, गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स शर्यतीत आहे. यापैकी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सपैकी कोण अंतिम फेरी गाठणार याचा फैसला 29 मे रोजी क्वॉलिफायर 2 फेरीत होणार आहे. असं असताना या स्पर्धेतून चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने यंदाच्या पर्वात 14 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आणि 12 गुणांसह आठव्या स्थानी राहिला. या स्पर्धेतील 14 सामन्यात धोनी एकही सामना खेळला नाही. दुखापतीमुळे मैदानापासून दूर राहिला. चेपॉक मैदानावर शेवटचा सामना खेळेल अशा वावड्या उठल्या होत्या. मात्र त्या बातम्याही वावड्या ठरल्या. दुसरीकडे, याच मैदानात फोटो सेशन झाल्याने धोनी निवृत्ती घेणार असंही बोललं गेलं. पण धोनीने यावेळी अंदाज वर्तवणाऱ्यांना चकवा दिला. त्यामुळे धोनी पुढच्या पर्वात खेळणार का? असा प्रश्न आहे.

आयपीएल 2026 मध्ये चेन्नई येथे झालेल्या सीएसकेच्या अंतिम सामन्यानंतर धोनीने चाहत्यांना अभिवादन केले. त्यामुळे धोनी अचानक निवृत्ती जाहीर करू शकतो अशी भीती चाहत्यांना आहे. कारण त्याने यापूर्वी असं केलं आहे. महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांना धोनीने सामना खेळून निवृत्त व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढच्या पर्वात धोनीने खेळावं अशी मागणी जोर धरत आहे. दुसरीकडे, महेंद्रसिंह धोनीनेही पुढच्या पर्वात खेळणार की नाही याबाबत स्पष्ट काही सांगितलेलं नाही. असं असताना चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी धोनीच्या आयपीएल 2027 मध्ये सहभागी आणि निवृत्तीबाबत माहिती दिली आहे.

क्रिकबझशी दिलेल्या मुलाखतीत सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन म्हणाले की, धोनी पुढच्या पर्वात खेळू शकतो. काशी विश्वनाथन म्हणाले की, “मला विश्वास आहे की तो पुढच्या हंगामात परत येईल. आम्ही अद्याप त्याच्याशी याबद्दल बोललो नाही, पण आम्हाला आशा आहे की धोनी परत येईल.” धोनी आपला शेवटचा सामना चेन्नईमध्ये खेळेल आणि त्याने आपले वचन पाळावे अशी त्यांची इच्छा आहे. धोनीने सांगितलं की, “आम्हालाही आशा आहे की धोनी सीएसकेच्या चाहत्यांना दिलेले वचन पाळेल आणि आपला शेवटचा सामना चेन्नईमध्ये खेळेल.”

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा