AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Orange Cap Holder : वैभव सूर्यवंशी फायर खेळीसह पहिल्या स्थानी, साई सुदर्शनला संधी, कोण बाजी मारणार?

IPL 2026 Orange Cap Holder: गुजरात टायटन्सचा युवा फलंदाज साई सुदर्शन याला सलग दुसऱ्यांदा ऑरेंज कॅप जिंकण्याची संधी आहे. मात्र त्याच्यासमोर राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशी याचं आव्हान आहे.

IPL 2026 Orange Cap Holder : वैभव सूर्यवंशी फायर खेळीसह पहिल्या स्थानी, साई सुदर्शनला संधी, कोण बाजी मारणार?
Vaibhav Sooryavanshi Orange Cap IPL 2026Image Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 28, 2026 | 7:42 PM
Share

क्रिकेट चाहत्यांना अवघ्या 2 सामन्यांच्या निकालानंतर आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील विजेता संघ मिळणार आहे. साखळी फेरीनंतर प्लेऑफमधील 2 असे एकूण 72 सामने यशस्वीरित्या खेळवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन्स होणार की राजस्थान आणि गुजरातपैकी चॅम्पियन्स ठरणार? याची प्रचंड उत्सूकता चाहत्यांना लागून आहे. तर दुसऱ्या बाजूला वैयक्तिक पातळीवर फलंदाजांमध्ये ऑरेंज कॅपसाठीही चुरस आहे. एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ही कॅप देण्यात येते. ताज्या आकडेवारीनुसार, 19 व्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राजस्थान रॉयल्सचा 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी पहिल्या स्थानी आहे. वैभवने इतर सर्वांना मागे टाकून पहिलं स्थान पटकावलं आहे. वैभवने गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज साई सुदर्शन याला मागे टाकलंय. वैभवने यासह ऑरेंज कॅप जिंकण्याचा दावा आणखी मजबूत केला आहे.

वैभव सूर्यवंशी याची मोठी उडी

वैभव सूर्यवंशी याने 27 मे रोजी एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मोठी खेळी केली. वैभवने यासह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत थेट पाचव्या क्रमांकावरुन पहिल्या स्थानी झेप घेतली. वैभवने हैदराबाद विरुद्ध अवघ्या 29 बॉलमध्ये 97 रन्स केल्या. वैभवच्या नावावर या सामन्याआधी एकूण 583 धावा होत्या. तर आता 15 डावांनंतर वैभवच्या नावावर 680 धावा झाल्या आहेत. वैभवने यासह 652 धावा नावावर असणाऱ्या साई सुदर्शन याला मागे टाकलं आहे. मात्र त्यानंतरही चुरस कायम आहे.

साई सुदर्शनकडे वैभवला पछाडण्याची संधी

साईकडे क्वालिफायर 2 सामन्यात मोठी खेळी करुन वैभवला मागे टाकण्याची संधी आहे. इशान किशन आणि हेन्रिक क्लासेन या दोघांकडे एलिमिनेटर सामन्यात मोठी खेळी करुन या शर्यतीत राहण्याची संधी होती. मात्र दोघेही अपयशी ठरले. त्यामुळे हैदराबादचा पराभवासह स्पर्धेतून बाजार उठला.

साई सलग दुसऱ्यांदा कॅप जिंकणार?

दरम्यान साई सुदर्शन याच्याकडे सलग दुसऱ्यांदा ऑरेंज कॅपचा विजेता होण्याची संधी आहे. साई 2025 साली ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता. साईने तेव्हा 15 डावांत 759 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता साई सलग दुसऱ्यांदा ऑरेंज कॅप पटकावणार की वैभव सूर्यवंशी हा मोठा बहुमान मिळवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा