मुकेश अंबानी यांनी आपल्या कर्मचाऱ्याला गिफ्ट केले 22 मजल्याचं घर, किंमत किती माहीतेय का ? कोण आहे तो नशीबवान

| Updated on: Apr 24, 2023 | 6:30 PM

उद्यागपती मुकेश अंबानी त्यांच्या कर्मचाऱ्यांची खूपच काळजी घेतात. ते बेस्ट बॉस का आहेत याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.

मुकेश अंबानी यांनी आपल्या कर्मचाऱ्याला गिफ्ट केले 22 मजल्याचं घर, किंमत किती माहीतेय का ? कोण आहे तो नशीबवान
mukesh ambani
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : देशातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेल्या उद्योजक मुकेश अंबानी यांच्या आपल्या कामगारांबाबतच्या काळजी घेण्याचे अनेक किस्से अधूनमधून चर्चेत येत असतात. ते त्यांच्या यशाचं श्रेय त्यांचे कर्मचारी आणि भागधारकांना देतात. त्यांच्यासाठी ते काहीही करायला एका पावलावर तयार असतात. आता मुकेश अंबानी यांनी त्यांच्या रिलायन्स ग्रुपच्या आपल्या एका कर्मचाऱ्याला आलीशान घर गिफ्ट दिले आहे. या घराची किंमत ऐकून तुमचा विश्वासच बसणार नाही इतकी ती जास्त आहे.

रिलायन्स ग्रुपचे सर्वेसर्वा उद्योगपती मुकेश अंबानी जागतिक क्रमवारीही मुकेश अंबानी टॉप दहा श्रीमंत व्यक्तींंमध्ये विराजमान आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष असलेले मुकेश अंबानी आता 66 वर्षांचे आहेत. ते त्यांच्या कर्मचाऱ्यांची खूपच काळजी घेतात. ते बेस्ट बॉस का आहेत याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. ते ऐकून तुमचा तुमच्या कानावर विश्वास बसणार नाही इतकी किमती वस्तू त्यांनी कर्मचाऱ्याला भेट म्हणून दिली आहे. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याला चक्क 1500 कोटीचं घर भेट म्हणून दिले आहे.

 हा भाग्यवान कर्मचारी कोण ?

वास्तविक मुकेश अंबानी यांनी आपल्या ज्या कर्मचाऱ्याला 1500 कोटीचं घर भेट म्हणून दिले आहे. ते त्यांचा उजवा हात मानले जातात. ही कोणी ऐरीगैरी असामी नव्हे हे आहेत मनोज मोदी. मनोज मोदी हे मुकेश अंबानी यांचे खास विश्वासू कर्मचारी असून त्यांच्या वाचून त्यांचे पानही हलत नाही. मुकेश यांच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होतो.

हे 22 मजल्यांचे आलिशान घर आहे कुठे ?

मुकेश अंबानी यांनी मनोज मोदींना दिलेले घर 22 मजल्याचे आहे. हे निवासस्थान 1.7 लाख चौरस फूट क्षेत्रफळावर उभे आहे. हे घर मुंबईच्या अत्यंत उच्चभ्रु वस्तीत नेपियन्सी रोडवर उभे आहे. या निवासस्थानाची किंमत तब्बल 1500 कोटी सांगितली जात आहे. मुकेश मोदी हे मुकेश यांचे कर्मचारीच नव्हे तर त्यांचे वर्गमित्रही आहेत. दोघांनी मुंबई विद्यापीठाच्या केमिकल्स टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये एकत्र अभ्यासक्रम पूर्ण केला होता. 1980 च्या दशकाच्या सुरूवातीला रिलायन्समध्ये त्यांनी प्रवेश केला. मुकेश यांचे पिताश्री रिलायसन्स इंडस्ट्रीचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी रिलायसन्समध्ये नोकरीला सुरूवात केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अनेक दशके मनोज मोदी मुकेश आणि त्यांची पत्नी नीता यांचे मित्र आहेत. मनोज मोदी आता तिसऱ्या पिढीतील मुकेश यांची मुले आकाश आणि ईशा अंबानी यांच्यासोबत काम करीत आहेत.