स्वस्त मोबाइल कॉलिंगनंतर स्वस्त इंधन…मुकेश अंबानी यांनी या कंपन्यांसोबत मिळून बनवला मेगा प्लॅन

Reliance mukesh ambani: हायड्रोजन इंधनावर धावणाऱ्या कारमुळे प्रदूषण कमी होणार आहे. तसेच त्याला खर्च पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत कमी येतो. तसेच कार चालवताना धूराऐवजी त्या ठिकाणी पाणी निघते. या इंधनामुळे कारचा प्रती किलोमीटर 6 ते 10 रुपये असणार खर्च कमी होऊन 4 रुपये प्रती क‍िलोमीटरवर येणार आहे.

स्वस्त मोबाइल कॉलिंगनंतर स्वस्त इंधन...मुकेश अंबानी यांनी या कंपन्यांसोबत मिळून बनवला मेगा प्लॅन
mukesh ambani
Follow us
| Updated on: Apr 11, 2024 | 2:28 PM

रिलायन्स भारतात स्वस्त मोबाईल कॉलींग आणले. त्यानंतर मोबाईल सर्वसामान्यांपर्यंत गेला. मोबाईल सुरुवातीला आले तेव्हा इनकमिंग कॉलसुद्धा पैसे लागत होते. परंतु आता अनलिमिटेड कॉलिंग सुरु झाले आहे. यामुळे रस्त्या रस्त्यावर दिसणारे एसटीडी बुथ बंद झाले. सर्वांच्या हातात मोबाईल आले. मोबाईलच्या या क्रांतीनंतर इंधन क्षेत्रात बदल करण्याचे काम रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सुरु केले आहे. या बदलामुळे सहा ते दहा रुपये किलोमीटर असलेला कारचा इंधन खर्च चार रुपयांवर येणार आहे.

एक लाख कोटींची गुंतवणूक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काही महिन्यांपूर्वी हायड्रेजन इंधनावर चालणारी कार घेऊन संसदेत पोहचले होते. त्या गोष्टीची चर्चा खूप झाली. हायड्रोजन फ्यूल आता भविष्यातील इंधन म्हणून पाहिले जात आहे. यामुळे पर्यावरणाचा फायदा होणार आहे. तसेच इंधन खर्च वाचणार आहे. मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज जगभरातील कंपन्यांसोबत मिळून फ्यूल इंडिया विकसित करत आहेत. यासाठी एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे इकोनॉमिक टाईम्समधील बातमीत म्हटले आहे. ग्रीन हाइड्रोजन आणि ग्रीन अमोनियाचा प्लँट गुजरामधील कच्‍छ येथील दीनदयाल पोर्ट अथॉरिटी (DPA) (कांडला पोर्ट) वर लावला गेला आहे.

या कंपन्यांसोबत करार

र‍िलायंस इंडस्‍ट्रीजकडून लार्सन अँड टूब्रो (L&T), ग्रीनको ग्रुप आणि वेल्सपून न्यू एनर्जीसोबत मिळून नवीन प्लँटवर काम केले जात आहे. त्यात आगामी काळात एक लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. ऑक्टोंबर 2023 मध्ये पोर्ट अथॉर‍िटीकडे या कंपन्यांनी 300 प्रती प्लॉटचे 14 भूखंड घेण्यासंदर्भात बोलणी सुरु केली होती. त्यांना मागील महिन्यात 14 प्‍लॉट दिले असून त्याचे क्षेत्र 4000 पेक्षा जास्त आहे. एक प्‍लॉटमधून वर्षाला 1 मिलियन टन (MTPA) ग्रीन अमोनिया उत्पादन करण्याचे लक्ष्‍य ठेवले आहे.

हे सुद्धा वाचा

कारचा खर्च होणार कमी

हायड्रोजन इंधनावर धावणाऱ्या कारमुळे प्रदूषण कमी होणार आहे. तसेच त्याला खर्च पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत कमी येतो. तसेच कार चालवताना धूराऐवजी त्या ठिकाणी पाणी निघते. या इंधनामुळे कारचा प्रती किलोमीटर 6 ते 10 रुपये असणार खर्च कमी होऊन 4 रुपये प्रती क‍िलोमीटरवर येणार आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.