मुकेश अंबानी यांनी कोट्यवधींच्या पगारावर पुन्हा सोडले पाणी! सलग 5 व्या वर्षांत म्हटले No Salary Please, कारण तरी काय?

Mukesh Ambani Salary : भारतीयच नाही तर जागतील उद्योग विश्वातील चर्चेतील नाव म्हणजे मुकेश अंबानी. ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. रिलायन्स समूहाचे ते सर्वेसर्वा आहेत. या समूहातील अनेक दिग्गज कोट्यवधींचा पगार घेतात. पण मुकेश अंबानी गेल्या पाच वर्षांपासून वेतनापोटी छद्दामही घेत नाहीत. काय आहे कारण?

मुकेश अंबानी यांनी कोट्यवधींच्या पगारावर पुन्हा सोडले पाणी! सलग 5 व्या वर्षांत म्हटले No Salary Please, कारण तरी काय?
मुकेश अंबानी पगार
| Updated on: Aug 07, 2025 | 3:32 PM

Reliance Group : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाचे मालक मुकेश अंबानी यांनी अजून एक रेकॉर्ड त्यांच्या नावे केला आहे. त्यांनी सलग पाचव्या वर्षी पगारापोटी, वेतनापोटी एक छदामही घेतला नाही. अंबानी यांनी आर्थिक वर्ष 2020-21 नंतर स्वतःसाठी कंपनीकडून पगार घेतला नाही. कोरोना काळात कंपनीच्या खर्चा कपात करण्यात आली होती. अनेक ठिकाणी कंपनी पैशांची बचत करत होती. त्याचवेळी मुकेश अंबानी यांनी स्वेच्छेने कंपनीकडून वेतन, अनुषंगिक लाभ, प्रवास भत्ते, सेवानिवृत्ती लाभ आणि इतर कोणत्याही प्रकारचे कमिशन न घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्याची खूप चर्चा झाली.

15 कोटी रुपये होता पगार

रिलायन्सच्या वार्षिक अहवालानुसार, कंपनीचे कार्यकारी संचालक निखील मेसवानी यांना एकूण 25 कोटी रुपये वार्षिक पगार अनुषांगिक भत्त्यांसह मिळतो. तर त्यांचे लहान बंधू हितल मेसवानी यांचा पगार ही 25 कोटींच्या घरात आहे. रिलायन्सचे अजून एक कार्यकारी संचालक पी एम एस प्रसाद यांचे वार्षिक वेतनही जवळपास 20 कोटींच्या घरात आहे.

मुकेश अंबानी यांनी आर्थिक वर्ष 2008-09 ते 2019-2020 या दरम्यान 15 कोटी रुपये असे मर्यादीत वेतन घेतले. त्यात त्यांनी कधीच वाढ केली नाही. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कोविड-19 महामारी आली. या काळात वेतन न घेण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. जोपर्यंत कंपनी आणि इतर व्यवसाय पुन्हा भरभराटीला येत नाहीत, तोपर्यंत आपण वेतन घेणार नाही, असे त्यांनी घोषणा केली. त्या निर्णयावर ते आजही ठाम आहेत.

आर्थिक वर्ष 2023-24 साठी त्यांनी वेतन, भत्ते, अनुषांगिक लाभ, सेवानिवृत्तीचा लाभ यावर पाणी सोडले होते. तर नवीन आर्थिक वर्षात त्यांचा हा संकल्प कायम आहे. त्यांनी वेतन आणि अनुषांगिक लाभ पुन्हा शून्यावर आणले आहेत. याचाच अर्थ ते कामाच्या मोबदल्यात कंपनीकडून एक छदाम पण घेणार नाहीत.

अशी होते कमाई

अंबानी कुटुंबातील सदस्यांचा रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 50.33 टक्के शेअर आहे. या कुटुंबाचा कमाईचा मोठा स्त्रोत रिलायन्स कंपनी आहे. हे कुटुंब आशियातील श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे. फोर्ब्स कंपनीच्या अहवालानुसार, या कुटुंबाची नेटवर्थ 113.5 अब्ज डॉलर इतकी होती. अंबानी कुटुंबाने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने लाशांश रुपात 3,322.7 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मुकेश अंबानी हे गेल्या पाच वर्षांपासून वेतन घेत नाहीत. त्यांना आर्थिक वर्ष 2023-24 साठी कंपनीच्या विविध बैठका आणि इतर निर्णय प्रक्रियेवेळी 2 लाख रुपये सिटिंग फी आणि 97 लाख रुपये कमीशन देण्यात आले होते.