Mukesh Ambani | नीता अंबानी यांच्या खाद्यांवर ही जबाबदारी, हा बिझनेस करणार लीड

Mukesh Ambani | मुकेश अंबानी, पत्नी नीता अंबानी यांच्यावर मोठी जबाबदारी टाकू शकतात. नीता अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज-वॉल्ट डिस्नी विलिनीकरणाच्या तयारीत आहेत. या नवीन मीडिया बिझनेसच्या नीता या चेअरपरसन होऊ शकतात. सध्या पण नीता अंबानी यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत.

Mukesh Ambani | नीता अंबानी यांच्या खाद्यांवर ही जबाबदारी, हा बिझनेस करणार लीड
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 2:25 PM

नवी दिल्ली | 28 February 2024 : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा आहेत. ते पत्नी नीता अंबानी यांना अजून काही जबाबदारी सोपवू शकतात. नीता अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज-वॉल्ट डिस्नीच्या विलिनीकरण नंतर तयार होणाऱ्या मीडिया कंपनीची चेअरपरसन होऊ शकते. नीता अंबानी यांनी रिलायन्स फाऊंडेशनच्या कामावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. आता रिलायन्स आणि डिस्नीच्या विलिनीकरणानंतर तयार होणाऱ्या कंपनीच्या त्या चेअरपरसन असतील. त्यांनी मुंबईत काही दिवसांपूर्वी कल्चरले सेंटर पण उभारलं आहे. रिलायन्स फाऊंडेशन, मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल, आयपीएलमधील मुंबई टीम, इतर अनेक उपक्रमाची जबाबदारी त्यांच्या खाद्यांवर आहे.

नीता अंबानी यांच्या खाद्यांवर मोठी जबाबदारी

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांच्या खाद्यांवर लवकरच मोठी जबाबदारी येऊ शकते. रिलायन्स-डिस्नी विलिनीकरणानंतर त्यांना या युनिटच्या संचालक मंडळात अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात येऊ शकते. रिलायन्स आणि डिस्नी भारत यांच्यात करार अंतिम टप्प्यात आहे. अखेरचा हात फिरवल्यानंतर दोन्ही पक्ष स्वाक्षरी करण्याच्या तयारीत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ही डील पूर्ण करण्यासाठी चर्चा होत आहे. लवकरच अथवा या आठवड्यात हा करार पूर्ण झाल्याची घोषणा होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

प्राथमिक टप्पा पूर्ण

या आठवड्याच्या सुरुवातीलाच, इकोनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार, मीडिया ऑपरेशन्स विलिनीकरणासाठी डिस्नी आणि रिलायन्स यांच्यामध्ये स्वाक्षरी झाली आहे. मर्ज केलेल्या या नवीन युनिटमध्ये रिलायन्सचा 61 टक्के वाटा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर उर्वरीत डिस्नेचा वाटा असेल.

भारतात डिस्नेला फटका

भारतात डिस्ने टीव्ही आणि स्ट्रीमिंग क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून आहे. पण अशात कंपनीचा व्यवसाय मंदावला आहे. क्रिकेट स्ट्रीमिंगमध्ये डिस्नेला रिलायन्स इंडस्ट्रीजकडून गळेकापू स्पर्धेला तोंड द्यावे लागले. रिलायन्सच्या ऑफरमुळे युझर्स डिस्ने सोडून रिलायन्सकडे वळले.

घरी लगीनघाई

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा सर्वात लहान मुलगा अनंत अंबानी याचे लग्न राधिका मर्चेंट हिच्याशी होत आहे. अनंत अंबानी याचे लग्न जुलै महिन्यात होत आहे. पण विवाहसंबंधीचे कार्यक्रम 1 मार्चपासून तीन दिवसांसाठी सुरु होत आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये लग्नापूर्वी काही कार्यक्रम होत आहे. अनंत अंबानी याचे लग्न राधिका मर्चेंट हिच्याशी होत आहे. राधिका एनकोर हेल्थकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वीरेन मर्चेंट आणि शैला मर्चेंट यांची छोटी मुलगी आहे. श्रीमंत वऱ्हाडी जामनरमध्ये तंबूत थांबणार आहेत.

Non Stop LIVE Update
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.
'दिवार'मधील 'तो' डायलॉग म्हणत चतुर्वेदींकडून शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल
'दिवार'मधील 'तो' डायलॉग म्हणत चतुर्वेदींकडून शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल.
कॅमेरा सोमय्या शायनिंग.., होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले
कॅमेरा सोमय्या शायनिंग.., होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले.
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?.
'लाव रे तो व्हिडीओ' रिटर्न... राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा
'लाव रे तो व्हिडीओ' रिटर्न... राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा.
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?.