
मुकेश अंबानी यांच्या सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जानेवारी ते मार्च या तिमाहीत कंपनीला 18,951 कोटी रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. या आनंदात रिलायन्सने गुंतवणूकदारांना लाशांभ जाहीर केला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत निव्वळ नफ्याचा आकडा कमी असला तरी तो एकदमच निराशाजनक नक्कीच नाही. गेल्यावर्षी कंपनीला 19,299 कोटी रुपयांचा फायदा झाला होता. वार्षिक आधारावर कंपनीला 1.80 टक्क्यांचे नुकसान सहन करावे लागले.

नफा घसरला असला तरी एकत्रित महसूलात वार्षिक आधारावर वृद्धी नोंदविण्यात आली आहे. वार्षिक आधारावर 11.3 टक्क्यांची वाढ झाली आहे. महसूल 2,40,715 कोटी रुपयांच्या घरात पोहचला. गेल्यावर्षी समान तिमाहीत हा आकडा 2,16,265 कोटी रुपये होता.

