AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Multibagger Stock: ये रे ये रे पैसा… छप्परफाड परतावा… 1 लाखाचे झाले 75 लाख

Multibagger Stock: या कंपनीने गुंतवणूकदारांना अफाट परतावा दिला. केवळ एकाच कंपनीने नाही तर इतरही अनेक कंपन्यांनी सुद्धा गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिला आहे. एक लाखाच्या गुंतवणुकीवर 75 लाख इतका परतावा दिला आहे.

Multibagger Stock: ये रे ये रे पैसा... छप्परफाड परतावा... 1 लाखाचे झाले 75 लाख
| Updated on: Jun 18, 2026 | 4:05 PM
Share

Multibagger Stock: शेअर बाजारात केवळ काही तासात अथवा दिवसांत मोठा परतावा मिळत नसतो. जे गुंतवणूकदार दमदार फंडामेंटल्स कंपन्यांमध्ये गुंतवणूक कायम ठेवतात. गुंतवणूक करताना संयम ठेवतात. त्यांची संपत्ती काही वर्षात तुफान वाढते. गेल्या 5 वर्ष ते 10 वर्षादरम्यान काही शेअरने हे सिद्ध केले आहे. या शेअरने 2,600% ते 7429% पेक्षा अधिकचा रिटर्न दिला आहे. काही शेअरमध्ये एक लाखांची गुंतवणूक 75 लाखांपर्यंत पोहचली आहे.

वन ग्लोबल सर्व्हिस प्रोव्हाईडर : 5 वर्षात 7429% रिटर्न

18 जून 2021 रोजी वन ग्लोबल सर्व्हिस प्रोव्हायडर या कंपनीचा शेअर 9.70 रुपये होता. आज 5% तेजीसह हा शेअर 730.40 रुपयांवर पोहचला. गेल्या 5 वर्षात गुंतवणूकदारांना 7429% इतका छप्परफाड रिटर्न दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 9.70 रुपये भाव असताना 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि ती कायम ठेवली असती तर त्याला 75 लाख रुपयांपर्यंतचा परतावा मिळाला असता. वन ग्लोबल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीची सुरुवात 1992 मध्ये झाली होती. ही लाईफ सायन्स आणि आरोग्याशी संबंधित आहे. आता कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि आयटी कन्सल्टन्सी सेवांमध्ये सुद्धा अग्रेसर ठरली आहे.

अदानी एंटरप्राईजेज: 5,671% रिटर्न

गौतम अदानी यांची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्राइजेजने गेल्या 10 वर्षात मोठी मजल मारली आहे. गुंतवणूकदारांची गुंतवणूक जवळपास 5,671% वाढली. 1 लाखांची गुंतवणूक जवळपास 57.7 लाख झाली आहे. या कंपनीची ओळख आता केवळ एका क्षेत्रापुरती मर्यादीत नाही. ही कंपनी एअरपोर्ट, ग्रीन हायड्रोजन, डेटा सेंटर आणि रस्ते विकास क्षेत्रात विस्तारत आहे. गेल्या 10 वर्षांत याची विक्री 11% वार्षिक चक्रव्याढ व्याजदराने (CAGR) वाढली. तर नफ्यात 26% CAGR वाढ झाली.

हिताची एनर्जी इंडिया : 4,297% ची उडी

विद्युत पारेषण आणि वितरण प्रणालीचे आधुनिकीकरणात हिताची एनर्जी इंडिया कंपनीचा मोठा वाटा आहे. ट्रान्सफॉर्मर आणि ग्रिड ऑटोमेशन सिस्टिम तयार करणाऱ्या या कंपनीने 10 वर्षांत 4,297% इतका रिटर्न दिला आहे. या कंपनीची विक्रीचा आकडाही जोरदार आहे. गेल्या पाच वर्षात 19% CAGR आणि गेल्या तीन वर्षांत 22% CAGR त्यात वाढ झाली. नफ्यातही चांगली वाढ झाली. पाच वर्षात कंपनीने 54% तर तीन वर्षात 122% CAGR नफा कमावला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले.

बीएसई: किरकोळ गुंतवणूकदारांमुळे 3,427% ची झेप

देशातील सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज बीएसई गेल्या दशकभरात गुंतवणूकदारांसाठी सुपरहिट ठरला आहे. या शेअरने 10 वर्षांत 3,427% इतका रिटर्न दिला आहे. स्थानिक गुंतवणूकदारांची लाट, मोठ्या संख्येने नवीन डीमॅट खाती आणि ट्रेडिंग व्यवहारातील वाढीचा मोठा फायदा बीएसईच्या कमाईवर झाला आणि पर्यायाने गुंतवणूकदारांनाही चांगला परतावा मिळाला.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. ही केवळ माहिती आहे. कुठल्याही गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल