AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाच वर्षात 1 लाखाचे केले 6 कोटी, हा परीस लागला का तुमच्या हाती? गुंतवणूकदारांना झटक्यात लागली की लॉटरी

Multibagger Stock : पेनी स्टॉकमधील गुंतवणूक ही अत्यंत जोखमीची असते. पण या पेनी स्टॉकने धमाका केला आहे. त्याने गुंतवणूकदारांना लॉटरी लावली आहे. या स्टॉकने गुंतवणूकदारांना 62 हजार टक्के परतावा दिला आहे. या स्टॉकने एका वर्षात 1 लाख रुपयांचे 6 कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. तुमच्या हाती लागला का हा परीस?

एकाच वर्षात 1 लाखाचे केले 6 कोटी, हा परीस लागला का तुमच्या हाती? गुंतवणूकदारांना झटक्यात लागली की लॉटरी
गुंतवणूकदारांचा भांगडा
| Updated on: Oct 11, 2024 | 9:59 AM
Share

शेअर बाजारातून कमाई करणाऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्वाची ठरू शकते. एखादा शेअर कुणाला मालामाल करतो तर कुणाला पार कंगाल करतो. शेअर बाजारात अशी शकड्यानं उदाहरण आहेत. पेनी स्टॉकमधील गुंतवणूक ही फार जोखमीची मानण्यात येते. पण या छोटुरामने मोठी कमाल केली आहे. त्याने गुंतवणूकदारांना लॉटरी लावली आहे. या स्टॉकने गुंतवणूकदारांना 62 हजार टक्के परतावा दिला आहे. या शेअरमध्ये गेल्या 135 दिवसांपासून सातत्याने अपर सर्किट लागले आहे. या स्टॉकने एका वर्षात 1 लाख रुपयांचे 6 कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. तुमच्या हाती लागला का हा परीस?

कोणता आहे हा स्टॉक?

Sri Adhikari Brothers चे SAB हे चॅनल तुम्ही पाहिले असेल. त्यावरील विनोदी मालिकांनी तुमचे भरपूर मनोरंजन केले. तर या कंपनीच्या स्टॉकने आता गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअरमध्ये गेल्या 135 दिवसांपासून सातत्याने अपर सर्किट लागले आहे. या स्टॉकने गुंतवणूकदारांना 62 हजार टक्के परतावा दिला आहे. यामध्ये एक लाखांची गुंतवणूक करणारा प्रत्येक गुंतवणूकदार कोट्याधीश झाला आहे. सातत्याने अप्पर सर्किट लागत असल्याने कोणताच गुंतवणूकदार हा स्टॉक विक्री करण्यास तयार नाही. गेल्या 6 महिन्यात या स्टॉकने गुंतवणूकदारांना 1650 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे.

काय करते ही कंपनी?

श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड ही मुंबईतील एक टेलिव्हिजन नेटवर्क कंपनी आहे. या कंपनीने 1990 च्या दशकात दूरदर्शन, स्टार प्लस आणि इतर टेलिव्हिजन चॅनल्ससाठी टीव्ही मालिका तयार केल्या आहेत. याशिवाय कंपनीने 1999 मध्ये त्यांचे स्वत:चे विनोदी चॅनल सब टीव्ही सुरू केलेले आहे. त्यात आता सोनी कंपनी भागीदार झाली आहे.

45 रुपयांवरून हनुमान उडी

Sri Adhikari Brothers च्या स्टॉकमध्ये 3 एप्रिलपासून आजपर्यंत 11 ऑक्टोबरपर्यंत 135 दिवसात अपर सर्किट लागले आहे. एप्रिल महिन्यात हा स्टॉक 45 रुपयांवर होता. तो आता वाढून 986 रुपयांवर पोहचला आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते हा मल्टिबॅगर स्टॉक लवकरच 1000 रुपयांचा टप्पा गाठेल. एकाच महिन्यात हा शेअर 664 रुपयांहून 986 रुपयांवर पोहचला आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.