AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Multibagger : दारुमुळे आर्थिक नुकसान, पण दारु कंपनीच्या शेअरने केले गुंतवणूकदारांना मालामाल!

Multibagger : दारु पिण्याने अनेक जण उद्धवस्त झाले असले तरी या दारुच्या या स्टॉकने अनेकांना लॉटरी लावली..

Multibagger : दारुमुळे आर्थिक नुकसान, पण दारु कंपनीच्या शेअरने केले गुंतवणूकदारांना मालामाल!
दारुच्या शेअरने केले मालामालImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Nov 15, 2022 | 9:02 PM
Share

नवी दिल्ली : आता मॅजिक मोमेंट वोडका आणि 8PM या ब्रँडची (Brand) चव तुम्ही मित्रांसोबत चाखली की नाही, तुम्हालाच माहिती. पण दारुमुळे (Liquor) अनेक जण उद्धवस्त झाल्याचे आपल्या आजुबाजूला अनेक उदाहरणे आहेत. पण ही दोन दारुची नावं ज्या कंपनीची आहेत, त्या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना (Investors) मालामाला केले आहे, हे सांगितल्यावर तुम्हाला शॉक लागल्याशिवाय राहणार नाही.

तर दारुचं उत्पादन करणारी दिग्गज कंपनी रेडिको खेतान (Radico Khaitan Ltd) या कंपनीने दीर्घ कालीन गुंतवणुकीत जोरदार परतावा दिला आहे. पण गेल्या वर्षी या कंपनीचा शेअर 6 टक्क्यांनी घसरला आहे.

वार्षिक आधारावर हा शेअर फारशी कमाल दाखवू शकलेला नाही. वार्षिक ते वार्षिक आधारावर या शेअरमध्ये 17.81 टक्क्यांची घसरण दिसून आलेली आहे. पण गेल्या सहा महिन्यात या शेअरने 35 टक्क्यांची वृद्धी नोंदवली आहे. या शेअरने गुंतवणूकदारांची रक्कम 128 पट्टीने वाढवली आहे.

दारु तयार करणाऱ्या या शेअरचा भाव आता हजारांचा पुढे आहे. पण 20 जून 2003 रोजी या शेअरची किंमत अवघी 7.78 रुपये होती. शुक्रवारी या शेअरमध्ये 0.51 टक्क्यांची घसरण झाली. तेव्हा हा शेअर 1,003 रुपयांवर बंद झाला होता.

गेल्या महिन्यात हा शेअर 4 टक्क्यांनी घसरला आहे. तरीही 20 वर्षांपूर्वी एखाद्याने एक लाख रुपयांचे शेअर घेतले असते तर आज त्याची किंमत 1.30 कोटी रुपये असती. म्हणजे या कंपनीने जोरदार परतावा दिला आहे.

दीर्घकालीन गुंतवणूकदारांना या कंपनीने मालामाल केले आहे. तर अल्पवधीसाठी या कंपनीत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनाही मोठा फायदा झाला आहे. हा शेअर 6 टक्क्यांहून अधिक मजबूत झाला आहे.

भारतात विदेशी मद्य तयार करणाऱ्या प्रमुख कंपन्यांमध्ये रेडिको खेतान ही अग्रेसर कंपनी आहे. कॉन्टेसा रम, ओल्ड एडमिरल ब्रँडी, मॅजिक मोमेंट वोडका, 8 PM यासारखी 15 ब्रँड्स ही कंपनी तयार करते.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.