AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Multibagger Stock | ऑलराऊंडर स्टॉक! सरकारी कंपनीने असा पाडला पैशांचा पाऊस

Multibagger Stock | या सरकारी कंपनीचा स्टॉक सध्या तुफान तेजीत आला आहे. गुंतवणूकदारांना या स्टॉकने मल्टिबॅगर रिटर्न दिला आहे. केवळ 6 महिन्यात या शेअरने 150 टक्क्यांचा परतावा दिला आहे. हा स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओत आहे का? तो तुमचा पोर्टफोलिओ मजबूत करेल. कोणती आहे ही सरकारी कंपनी?

Multibagger Stock | ऑलराऊंडर स्टॉक! सरकारी कंपनीने असा पाडला पैशांचा पाऊस
| Updated on: Oct 14, 2023 | 3:16 PM
Share

नवी दिल्ली | 14 ऑक्टोबर 2023 : शेअर बाजारात काही सरकारी कंपन्यांची कामगिरी जोरदार आहे. या सरकारी कंपन्यांनी गुंतवणूकदारच नाही तर तज्ज्ञांचा भरवसा जिंकला आहे. बाजारातील मोठ्या कंपन्यांपेक्षा या कंपन्यांनी तगडा रिटर्न दिला आहे. एखाद्या दिग्गज फलंदाजासारखीच त्यांनी तडाखेबंद बॅटिग केली आहे. या सरकारी कंपनीच्या शेअरने चमकदार कामगिरी बजावली आहे. या स्टॉकने अवघ्या 6 महिन्यात 150 टक्क्यांचा परतावा दिला आहे. सध्या हा स्टॉक 100 रुपयांच्या आत आहे. ही कंपनी एकाचवेळी अनेक क्षेत्रात काम करत आहे. येत्या काही दिवसांत हा शेअर लांब पल्ला गाठेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

MMTC चा ब्रँड

सरकारी कंपनी MMTC ने ही कामगिरी बजावली आहे. या कंपनीचा शेअर तुफान तेजीत आहे. ही सरकारी कंपनी सोने-चांदीच्या नाण्यांच्या विक्रीसह इतर वस्तूंची विक्री करते. कंपनीने लिथियम, कोबाल्ट आणि सिलिकॉन सारख्या क्षेत्रातही दबदबा तयार केला आहे. त्यामुळे येत्या काळात ही कंपनी मोठी झेप घेईल. तिचा व्यवसाय वाढेल.

30 रुपयांचा शेअर पोहचला 75 रुपयांवर

एमएमटीसी लिमिटेडचा शेअर 6 महिन्यांपूर्वी केवळ 29.95 रुपयांवर होता. सध्या हा शेअर 75.05 रुपयांवर पोहचला आहे. गेल्या 6 महिन्यात या शेअरने 150.58 टक्क्यांची वृद्धी नोंदवली. केंद्रीय मंत्रिमंडळाने खाण, खनिजकर्म अनियमात संशोधन केले आहे. यामध्ये लिथियम, नियोबियम आणि रेअर अर्थ एलिमेंट्स सारख्या महत्त्वाच्या खनिजांच्या रॉयल्टीबाबत नवीन तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्याचा फायदा या कंपनीला मिळणार आहे.

दीड महिन्यात 77 टक्के रिटर्न

केंद्र सरकारने लिथियम, कोबाल्ट आणि सिलिकॉन खनिजासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचा परिणाम कंपनीच्या शेअरवर दिसत आहे. ही खनिजं देशात इलेक्ट्रिक वाहन, ग्रीन एनर्जी आणि ग्रीन इकोनॉमी वाढीसाठी महत्वाची भूमिका अदा करणार आहे. गेल्या दीड महिन्यात या कंपनीचा शेअर 77 टक्क्यांनी वधारला आहे. येत्या काही दिवसात या शेअरमध्ये अजून वृद्धी दिसू शकते, असा तज्ज्ञांचा दावा आहे.

शेअरमध्ये येईल तेजी

तज्त्रांच्या मते, एमएमटीसीचा शेअर काही दिवसांत मोठा पल्ला गाठू शकतो. हा शेअर लवकरच 85 टक्क्यांचा भाव गाठू शकतो. पण शेअर बाजार हा जोखीमेचा आहे. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि बाजारातील घाडमोडींचा अभ्यास असणे आवश्यक आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.