AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Multibagger Stocks : एकाच महिन्यात गुंतवणूकदारांना लॉटरी! या शेअरची कमाल

Multibagger Stocks : या शेअरने एकाच महिन्यात गुंतवणूकदारांना मालामाल केले. तुम्ही बँकेच्या एफडीत ही गुंतवणूक केली असती तर तुम्हाला 10 वर्षे वाट पाहावी लागली असती.

Multibagger Stocks : एकाच महिन्यात गुंतवणूकदारांना लॉटरी! या शेअरची कमाल
| Updated on: Aug 03, 2023 | 7:36 PM
Share

नवी दिल्ली | 03 ऑगस्ट 2023 : पारंपारिक गुंतवणूकदार आजही एफडीत, आरडीत, सोन्यात गुंतवणूक करणे पसंत करतात. त्यांना ही गुंतवणूक एकतर सुरक्षित वाटते आणि दुसरं म्हणजे सरकारी बँका अथवा टपाल खात्यात गुंतवणूक (Post Office Investment) केल्यास पैसा बुडण्याचा धोका नसतो. पण सोनं वगळता इतर माध्यमात केलेल्या गुंतवणुकीवर परतावा अत्यंत कमी मिळतो. शेअर बाजारात अनेक स्टॉकमुळे गुंतवणूकदारांना लॉटरी लागते. पण काही स्टॉक एकदम मालामाल करतात. या स्टॉकने एकाच महिन्यात गुंतवणूकदारांना मालामाल केले. तुम्ही हीच गुंतवणूक बँकेच्या एफडीत (Bank FD) केली असती तर तुम्हाला 10 वर्षे वाट पाहावी लागली असती.

इस्त्रोसोबत काम

प्रीमियर एक्सप्लोजिव्स लिमिटेड (Premier Explosives Ltd) कंपनी इस्त्रोसोबत काम करते. इस्त्रोच्या विविध मोहिमांमध्ये या कंपनीने भाग घेतला आहे. या कंपनीचे प्रोफाईल तगडे आहे. या कंपनीचा शेअर बाजारात चमकला आहे. गेल्या पाच दिवसांत या शेअरचा भाव जवळपास 6 टक्क्यांनी वधारला. तर एक महिन्यात या शेअरच्या भावात 132 टक्क्यांपेक्षा अधिकची उसळी आली.

52 आठवड्यांच्या उच्चांकावर शेअर

या कंपनीचे मार्केट कॅप 1,100 कोटी रुपयांहून अधिक आहे. गुरुवारी बाजारात घसरण सुरु असताना हा शेअर मजबूत झाला. आज हा शेअर 1.28 टक्क्यांनी वधारला. हा शेअर 1,002.50 रुपयांवर बंद झाला. आजच्या व्यापारी सत्रात या शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,039.50 रुपये गाठला.

1 महिन्यात मोठी उसळी

गेल्या पाच दिवसांत या शेअरचा भाव जवळपास 6 टक्क्यांनी वधारला. तर एक महिन्यात या शेअरच्या भावात 132 टक्क्यांपेक्षा अधिकची उसळी आली. 4 जुलै रोजी हा स्टॉक 431 रुपयांवर होता. तो आता 1000 रुपयांपेक्षा अधिक आहे. म्हणजे एक महिन्यापूर्वीच या शेअरचा भाव दुप्पटीहून अधिक झाला.

बँक एफडीत लागले असते इतके दिवस

या शेअरच्या तुलनेत बँक एफडीत 10 वर्षे ही रक्कम दुप्पट करण्यासाठी लागले असते. बँकेच्या एफडीत सरासरी 7 टक्के दराने व्याज मिळते. जर बँकेच्या एफडीचा विचार करता, हा कालावधी दहा वर्षांपेक्षा अधिक असता. पण या शेअरने जो परतावा दिला आहे. तेवढा ही परतावा कदाचित इतक्या वर्षात मिळाला नसता. या शेअरने हा परतावा केवळ एका महिन्यातच दिला आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.