AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mutual Fund | गुंतवणूकदारांनी पॅटर्न बदलला; मोठ्या नाही तर छोट्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक

WITT Mutual Fund | म्युच्युअल फंडांना सुगीचे दिवस आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी त्यांच्या भाषणात याविषयीच्या आकडेवारीच विस्तृतपणे मांडली. पण एक गोष्ट समोर येत आहे, ती म्हणजे दिग्गज कंपन्यांऐवजी गुंतवणूकदारांच्या स्मॉल कॅप फंडावर उड्या पडल्या आहेत. त्यामागची कारणं काय आहेत?

Mutual Fund | गुंतवणूकदारांनी पॅटर्न बदलला; मोठ्या नाही तर छोट्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक
| Updated on: Feb 27, 2024 | 4:35 PM
Share

नवी दिल्ली | 27 February 2024 : सध्याच्या घडीला गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण म्युच्युअल फंडावर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याचे दिसून येते. TV9 नेटवर्कच्या ग्लोबल समिट ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ च्या दुसऱ्या पर्वामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्युच्युअल फंडातील या गुंतवणुकीचे आकडेच सर्वांसमोर मांडले. गेल्या दहा वर्षात म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचा आकडा गगना पार गेला आहे. शेअर बाजारापेक्षा थोडी सुरक्षितता आणि पारंपारिक गुंतवणुकीपेक्षा अधिकचा परतावा हे त्यामागचं खरं कारण आहे.

इतक्या पट वाढली गुंतवणूक

2014 मध्ये देशात लोकांनी 9 लाख कोटी रुपये म्युच्युअल फंडमध्ये ठेवले होते. आज 2204 मध्ये 52 लाख कोटींहून अधिक रुपये म्युच्युअल फंडात गुंतवल्याचे त्यांनी आकडेवारीसह सांगितले. पण गुंतवणुकीच्या पॅटर्नमध्ये एक बदल लक्षणीरित्या समोर येत आहे, तो म्हणजे गुंतवणूकदारांच्या स्मॉल कॅप फंडावर उड्या पडल्या आहेत. त्यांनी दिग्गज कंपन्यांना चार हात दूर ठेवले आहे, यामागची कारणं तरी काय आहेत?

हे आहे कारण

  1. व्हॅल्यू रिसर्चचे CEO धीरेंद्र कुमार यांच्यानुसार, स्मॉलकॅप स्टॉक हे लार्जकॅप स्टॉकपेक्षा अधिक क्रियाशील, व्होलेटाईल असतात. मिड कॅप-स्मॉल कॅप फंड्सने 2023 मध्ये 40-45 टक्के रिटर्न दिला होता. या जोरदार कामगिरीमुळे ज्या गतीने गुंतवणूक वाढली आहे, ती चितांजनक आहे.
  2. बाजार नियंत्रक SEBI ने पण सर्वसामान्य गुंतवणूकदार स्मॉलकॅप शेअर्स आणि फंड्समध्ये अपेक्षेपेक्षा जास्त गुंतवणूक करत असल्याने, चिंता व्यक्त केली आहे. पण जर व्होलेटिलीटी वाढली तर गुंतवणूकदार शेअर्स विक्रीचा धमाका लावतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
  3. Samco Mutual Fund च्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2024 मध्ये स्मॉल कॅप योजनेतंर्गत असेट अंडर मॅनजेमेंट (AUM) रेकॉर्ड 2.48 लाख कोटी रुपयांवर पोहचली. जानेवारीमद्ये हा आकडा 2.99 लाख कोटी रुपयांवर पोहचला. तर लार्ज-कॅप योजनेत AUM च्या जवळपास 83% होता.

धोका ओळखाल की नाही?

  • White Oak Capital Management चे CEO आशिष सौमय्या यांच्यानुसार, गेल्या दोन वर्षात स्मॉल कॅप फंडनी मोठा परतावा दिला आहे. पण सध्याच्या घडीला यातील अनेक स्टॉक्स महाग झाले आहेत. पण एका ठराविक मुदतीनंतर त्यांच्याकडून तसाच परतावा येत असल्याने त्याविषयी शंका व्यक्त होत आहे.
  • सध्या 250 स्टॉक्स स्मॉलकॅपमध्ये आहेत. तर मिडकॅपमध्ये 150 स्टॉक्स आहेत. ही साईज मर्यादित आहे. जर गुंतवणूकदारांकडून जास्त गुंतवणूक होत असेल तर ही गुंतवणूक फंड हाऊस या ठराविक स्टॉक्समध्येच गुंतवतील. आता हे स्टॉक्स बाजारात काय करतात यावर परताव्याचे गणित ठरेल.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं