ही बँक गोत्यात! SEBI ची मोठी कारवाई, माजी सीईओसह 5 खाते सील, शेअर बाजारात खळबळ
IndusInd Bank Case : बाजार नियंत्रक सेबीने या बँकावर जोरदार कारवाई केली. कथित आर्थिक अनियमिततेमुळे माजी सीईओ सुमंत कठपालिया यांच्यासह पाच अधिकाऱ्यांविरोधात कारवाई केली. त्यांचे ट्रेडिंग खाते बंद केले. त्यामुळे शेअर बाजारात खळबळ उडाली.

देशातील इंडसइंड बँक (IndusInd bank) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या बँकेवर बाजार नियंत्रक सेबीने धडक कारवाई केली आहे. माजी सीईओ सुमंत कठपालिया यांच्यासह पाच कार्यकारी अधिकाऱ्यांविरोधात इनसाईडर ट्रेडिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. सेबीने या बँकेत मोठी आर्थिक अनियमितता झाल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे त्यांची खाती सील करण्यात आली. शेअर बाजारात त्यांना बंदी घालण्यात आली. तर पाच व्यक्तींची बँक खाती जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बाजारात एकच खळबळ उडाली आहे. त्याचा परिणाम बाजारातील बँकेवर शेअरवर दिसण्याची शक्यता आहे.
बँक खाती बंद, शेअर बाजारात बॅन
मंगळवारी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाने मोठी कारवाई केली. इंडसइंड बँकेचे माजी सीईओ कठपालिया यांच्यासह इतर पाच जणांनी कथित दृष्ट्या कमावलेल्या 19.7 कोटींहून अधिक रुपयांची रक्कम जप्त करण्याचे निर्देश दिले. तर त्यांचे खाते सुद्धा बंद केले. बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, या बँक खात्यात रक्कम जमा करणे अथवा काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. सेबीने बाजारात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या शेअर खरेदी-विक्री करण्यास बंदी घातली आहे.
का केली SEBI ने कारवाई?
काही दिवसांपूर्वी IndusInd Bank Share च्या किंमतीत अचानक 27 टक्क्यांची घसरण आली, त्याचा Market Regulator सेबीला संशय आला. 10 मार्च 2025 रोजी बँकेने त्यांच्या डेरेव्हेटिव्ह पोर्टफोलिओत 1,529 कोटींच्या हेराफिराची कबुली दिली होती. सेबीने तपास केल्यानंतर पाच अधिकाऱ्यांवर कारवाई केली. यामध्ये इंडसइंड बँकेचे माजी सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सुमंत कठपालिया यांच्यासह अरुण खुराना, सुशांत सौरव, रोहन जथन्ना, अनिल मार्को राव यांचा समावेश आहे. सेबीने केलेल्या कारवाईने IndusInd Bank Share वर परिणाम दिसून आला. आताच बाजारात व्यापारी सत्र सुरू झाले. त्यात पहिल्या टप्प्यात सध्या बँकेच्या शेअरमध्ये चढउतार दिसत आहे. सध्या हा शेअर 808.05 रुपयांवर ट्रेड करत आहे. त्यात अजून थोड्यावेळात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदार जबाबदारीने आणि सयंमाने ट्रेड करत आहेत.
