नेपाळमध्ये बंडाचे वारे, या कंपन्यांना मोठा फटका, शेअर बाजारावर परिणाम काय? कोणती कंपनी किंगमेकर?

Nepal Stock Market : जनरेशन झेडच्या उग्र आंदोलनाने नेपाळ ठप्प झाले. राष्ट्रपती,पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाने राजीनामा दिला. त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. थेट स्टॉक एक्सचेंजच (NEPSE) बंद ठेवावे लागले. या कंपन्यांना जबरी फटका बसला आहे.

नेपाळमध्ये बंडाचे वारे, या कंपन्यांना मोठा फटका, शेअर बाजारावर परिणाम काय? कोणती कंपनी किंगमेकर?
नेपाळ स्टॉक मार्केट
| Updated on: Sep 10, 2025 | 1:51 PM

NEPSE Shuts Amid GenZ Protest : नेपाळमध्ये जनरेशन झेडच्या आंदोलनाने सरकार गडगडले. अर्थमंत्र्याला सडकून मार खावा लागला. संसद, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि नेत्यांची घरं पेटविण्यात आली. अनेकांनी जीव मुठीत घेऊन देशातून पळ काढला. गेल्या तीन दिवसांपासून नेपाळची परिस्थिती हातबाहेर गेली आहे. आता लष्करी राजवट लागू झाली आहे. या सर्व घडामोडीचा तिथल्या व्यापारावर, शेअर बाजावर मोठा परिणाम दिसून आला. सरकार पाठोपाठ शेअर बाजारही गडगडला. 9 सप्टेंबर रोजी हल्ल्याच्या भीतीने नेपाळमधील स्टॉक एक्सजेंच बंद करण्यात आले होते.

नेपाळच्या स्टॉक मार्केटला मोठा फटका

काल आंदोलन पेटले. त्यानंतर मंगळवारी 9 सप्टेंबर रोजी शेअर बाजार बंद करण्याची घोषणा करण्यात आली. 8 सप्टेंबर रोजी NEPSE इंडेक्स 35.99 अंकांनी घसरून 2,672.25 वर आला. तर दुसऱ्या दिवशी हल्ल्याच्या भीतीने स्टॉक एक्सचेंज (Nepal Stock Market Shut down) बंद करण्यात आला. त्यामुळे बाजाराचे भांडवल घसरून 44.67 खरब नेपाळी रुपयांवर आले.

हे शेअर सपाटून आपटले

  1. बाराही हाइड्रोपॉवर (BHPL) – शेअर 5.28 टक्क्यांनी घसरला
  2. पंचकन्या माई हाइड्रोपॉवर (PMHPL) – 4.62 टक्क्यांनी आपटला
  3. संपदा लघुवित्त वित्तीय संस्था (SMPDA) – 7.06 टक्क्यांनी धराशायी

या कंपन्यांची जोरदार कामगिरी

  • हिम स्टार ऊर्जा (HIMSTAR) – हा शेअर 9.99 टक्क्यांनी झेपावला
  • RBB म्युच्युअल फंड 1 (RMF1) – 7.93 टक्क्यांच्या तेजीसह मुसंडी
  • विकास हाइड्रोपॉवर (BHCL) – सातत्याने दोन दिवसांपर्यंत 10 टक्के अपर सर्किट

या कंपन्यांची घोडदौड कायम

नेपाळची सर्वाधिक मार्केट कॅपवाल्या कंपन्यांच्या यादीत, सूचीत काही बदल नोंदवण्यात आले आहे. नेपाळ रीइन्शुरन्स कंपनी 232.45 अब्ज रुपयांच्या मार्केट कॅपसह सर्वात आघाडीवर आहे. यानंतर विशाल बाजार कंपनी 219.09 अब्ज नेपाळी रुपये आणि नेपाळ दूरसंचार कंपनी 153.37 अब्ज नेपाळी रुपयांसह क्रमशः दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. नाबिल बँक आणि सिटीजन इन्वेस्टमेंट ट्रस्ट या दोन कंपन्या पण टॉप 5 मध्ये सहभागी आहेत. फेब्रुवारी 2025 मध्ये 338,376.435 हजार शेअर्सचे टर्नओव्हर झाला होते. जानेवारीपेक्षा बाजाराने आघाडी नोंदवली. बाजारात चढउतार दिसत आहे. सध्या नेपाळमधील परिस्थितीकडे बाजार आणि गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.