ओटीटीच्या बारा भानगडी… कसं असतं OTT रेव्हेन्यू मॉडेल, पैसा कसा येतो अन् कसा जातो? जाणून घ्या
आधी टीव्हीवर ब्रॉडकास्टर्सकडून जे दाखवलं जायचं तेच पाहावं लागयचं. दिवसभर कोणत्या चॅनेल्सवर काय आणि किती वाजता दाखवलं जाणार याबाबतची माहिती निवडक वृत्तपत्रांमध्ये दिली जायची, जे आवर्जुन पाहिलं जायचं. तसेच आवडीचा कार्यक्रम लागायची वाट पाहिली जायची. मात्र तंत्रज्ञान बदललं आणि दिवस फिरले. आता वाटेल ते आवडीनिवडीनुसार पाहता येतं. यामध्ये विविध ओटीटी प्लॅटफॉर्मचं मोठं योगदान आहे. मात्र या ओटीटीची सुरूवात कशी झाली? ओटीटी कंपनी कशा वाढल्या? त्यांची कमाई कशी होते? जाणून घ्या.

चित्रपटसृष्टीमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. सुरूवातीला ओटीटी प्लॅटफॉर्म आल्यावर फिल्म इंडस्ट्रीने मजबूत पैसा छापला. मात्र दिवस फिरलेत, आधी ओटीटी कंपन्या चित्रपटांसाठी कोटी रूपये देत त्याचे हक्क विकत घेत होते. आता ओटीटी कंपन्यांकडे चित्रपट घेऊन जावं लागत आहे. सिनेमा हॉलमध्ये जाण्यापेक्षा ओटीटीवर चित्रपट पाहण्याचा प्रेक्षकांचा कल वाढलाय. हा बदल कसा झाला आणि प्रेक्षकवर्ग ओटीटी प्लॅटफॉर्मकडे का आकर्षित होतोय जाणून घ्या. ओटीटी म्हणजे काय? ओटीटी म्हणजे Over the Top, बाजारात असे आता अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. यावर सिनेमा, वेब सीरीज आणि मालिका आपण पाहू शकतो. तुम्हाला प्रत्येक कॅटेगिरीमधील चित्रपट आणि वेब सीरीज...
