Radhika Merchant Net Worth : मुकेश अंबानी यांच्या धाकट्या सुनेची एकूण संपत्ती ऐकून डोळे होतील पांढरे, जगते असे आलिशान आयुष्य

Radhika Merchant Net worth : राधिका मर्चेंट यांची संपत्ती ऐकून डोळे होतील पांढरे

Radhika Merchant Net Worth : मुकेश अंबानी यांच्या धाकट्या सुनेची एकूण संपत्ती ऐकून डोळे होतील पांढरे, जगते असे आलिशान आयुष्य
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 10:19 PM

नवी दिल्ली : आशियातील आणि भारतातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या धाकट्या मुलाचे लग्न होत आहे. अंबानी यांचे चिरंजीव अनंतचे (Anant Ambani) लग्न राधिका मर्चेंट (Radhika Merchant) हिच्याशी होत आहे. दोघे लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. 29 डिसेंबर 2022 रोजी त्यांच्यात रोका झाला होता. राधिका एनकोर हेल्थकेअरचे सीईओ विरेन मर्चेंट यांची मुलगी आहे. राधिकाला शास्त्रीय नृत्याची आवड आहे. अंबानी यांच्या घरात लग्नाची लगबग सुरु झाली आहे. राधिकाची एकूण संपत्ती (Networth), तिचे शिक्षण याविषयी गुगल केल्या जात आहे.

मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अक्षय ऊर्जा क्षेत्रात उतरणार आहेत. या क्षेत्रात उतरण्यासाठी रिलायन्स समूहाने दीर्घकालीन योजना आखली आहे. राधिका हिने न्यूयॉर्क विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे. तर अनंतने अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे.

राधिका या एनकोर हेल्थकेअरच्या संचालिका आहेत. त्यांना पुस्तक वाचण्याची आवड आहे. पोहणे, नृत्य ही तिची आवड आहे. राधिका ही स्टाईलिश आहे. सध्या ती कुटुंबाचा व्यवसाय सांभाळत आहे. जीवनसाथी अनंत हा तिचा लहानपणीचा मित्र आहे.

हे सुद्धा वाचा

2018 साली या दोघांचे फोटो व्हायरल झाले होते. तेव्हापासून दोघांचे नाव समोर आले. राधिकाच्या आईचे नाव शैला मर्चेंट आहे. राधिका ही एकुलती एक मुलगी आहे. मीडिया रिपोर्टनुसार राधिकाची एकूण संपत्ती 8-10 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.

राधिकाचा जन्म मुंबईत झाला. 18 डिसेंबर 1994 रोजी राधिकाचा जन्म झाला. तिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मुंबईतच झाले. कॅथड्रल आणि जॉन कॅनन स्कूल, इकोले मोंडियल वर्ल्ड स्कूलमध्ये तिने शिक्षण पूर्ण केले. त्यानंतरचे शिक्षण तिने परदेशात पूर्ण केले.

तिने गुरु भावना ठाकर यांच्याकडून भरतनाट्यमचे शिक्षण घेतले. त्यांचे कुटुंब गुजरातमधील कच्छ भागातील आहे. अंबानी आणि मर्चेंट कुटुंबियांनी यावर्षी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अरंगेत्रमचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेता सलमान खान, रणवीर सिंह, आमिर खान, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजकीय नेते आणि नावाजलेल्या व्यक्ती उपस्थित होत्या.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.