AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Petrol, Diesel Rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

Petrol, Diesel Rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

Today Petrol, Diesel Rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
पेट्रोल Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 08, 2022 | 9:17 AM
Share

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol, Diesel Rates) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून राज्यात पेट्रोल (Petrol), डिझेलचे (Diesel) दर स्थिर आहेत. 21 मे रोजी केंद्राने पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्यूटी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 22 मे रोजी पेट्रोलच्या दरात साडेनऊ रुपयांची तर डिझेलच्या दरात प्रति लिटरमागे सहा रुपयांची कपात झाली तेव्हापासून राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.एकीकडे देशात गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र दुसरीकडे सीएनजी, पीएनजी आणि एलपीजीच्या दरात वाढ सुरूच आहे. याचा मोठा फटका हा सर्वसामान्यांना बसताना दिसून येत आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हॅट कपातीची घोषणा केली. व्हॅट कपाती नंतर इंधन स्वस्त झाले. मात्र इतर राज्यांच्या तुलनेत अद्यापही महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेलचे दर अधिक आहेत.

प्रमुख महानगरातील भाव

पेट्रोलियम कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.28 रुपये एवढा आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये एवढा आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये असून, डिझेलचा भाव प्रति लिटर 92.76 रुपये एवढा आहे. देशाच्या प्रमुख महानगराची तुलना करायची झाल्यास सर्वात महाग पेट्रोल हे मुंबईमध्ये तर सर्वात स्वस्त पेट्रोल, डिझेल दिल्लीमध्ये आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

शहरंपेट्रोलडिझेल
मुंबई106.3594.28
पुणे106.1092.58
नाशिक106.2292.70
नागपूर106.6593.14
कोल्हापूर106.0292.54

दररोज जारी होतात नवे दर

दरम्यान पेट्रोल, डिझेलचे दर हे कच्च्या तेलाच्या किमतींवर अवलंबून असल्याने पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज इंधनाचे नवे दर जारी केले जातात. आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेल दाराच्या स्थितीनुसार पेट्रोल, डिझेलचे भाव कमी- जास्त होत असतात. भारतात मात्र गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.