petrol, diesel new rates : पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ; वाहनधारकांना जोर का झटका, जाणून घ्या नवे दर

मोठी बातमी समोर येत आहे, पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना आता इंंधनासाठी जादा पैसा मोजावे लागणार आहेत. महागाईत आणखी एक मोठा फटका बसला आहे.

petrol, diesel new rates : पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ; वाहनधारकांना जोर का झटका, जाणून घ्या नवे दर
New petrol and diesel rates
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 11, 2026 | 10:01 PM

मोठी बातमी समोर येत आहे. महागाईने आधीच त्रस्त असलेल्या ग्राहकांना आता पुन्हा एकदा एक मोठा झटका बसला आहे. आता पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. जर तुम्ही देखील पेट्रोल भरण्यासाठी निघाला असाल तर ही बातमी महत्त्वाची आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची सपोर्ट कंपनी जियो-बीपीकडून पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान यापूर्वी नायरा एनर्जी या कंपनीने देखील आपल्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ केली होती, त्यानंतर आता जियो बीपीकडून देखील पेट्रोल, डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत.

किती झाली वाढ?

Loading...

मिंटने दिलेल्या वृत्तानुसार जियो-बीपीकडून पेट्रोलच्या दरात प्रति लिटर मागे 5 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलचे रेट प्रति लिटर 3 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. तात्काळ प्रभावाने हे दर लागू करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आता पेट्रोलचे दर प्रति लिटर 108.54 रुपयांवर पोहोचले आहेत तर डिझेलचे दर 99.19 रुपयांवर पोहोचले आहेत. हे पेट्रोल, डिझेलचे सर्वसामान्य दर आहेत. प्रत्येक राज्यांमध्ये ते वेगवेगळे असू शकतात.

चालू वर्षात पहिल्यांदा दरवाढ

अमेरिका आणि इराणमध्ये 28 फेब्रुवारी रोजी युद्धाला सुरुवात झाली. त्यानंतर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केलं. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद झाल्यामुळे भारतामध्ये मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं. कारण भारताला जेवढ्या प्रमाणात एकूण कच्च्या तेलाची गरज आहे. त्यातील जवळपास 40 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक याच मार्गाने होते. हा मार्ग बंद झाल्यामुळे मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं होतं. या काळात अनेक तेल कंपन्यांनी आपल्या इंधनाचे दर वाढवले होते. मात्र त्यावेळी या कंपनीने कोणतीही दरवाढ केली नव्हती, या वर्षात पहिल्यांदाच पेट्रोल, डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर पाच रुपयांची तर डिझेलच्या दरात प्रति लिटर तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us