नवी दिल्ली : नव्या आर्थिक वर्षात नोकरदारांवर बदललेल्या नियमांचा मोठा परिणाम होणार आहे. आगामी महिन्यात 1 एप्रिलपासून पगारांबाबतच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल होण्याची शक्यत आहे. जर हे बदल लागू झाले, तर तुमच्या पगार खात्यात (Salary account) कमी पैसे येऊ शकतात. कारण मागीलवर्षी संसदेत वेतन नियमावली विधेयक (Code on Wages Bill) मंजूर झालंय. हे विधेयक 1 एप्रिलपासून लागू होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. हे विधेयक लागू झाल्यास खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या खिशावर याचा थेट परिणाम होणार आहे. याचाच हा खास आढावा (New Salary rules in Code on Wages bill may apply from 1 April 2021).