नोकरदारांसाठी नवी ‘पगार व्यवस्था’, 1 एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता, तुमच्यावर काय परिणाम होणार?

| Updated on: Mar 15, 2021 | 4:20 PM

नव्या आर्थिक वर्षात नोकरदारांवर बदललेल्या नियमांचा मोठा परिणाम होणार आहे. आगामी महिन्यात 1 एप्रिलपासून पगारांबाबतच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल होण्याची शक्यत आहे.

नोकरदारांसाठी नवी पगार व्यवस्था, 1 एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता, तुमच्यावर काय परिणाम होणार?
पैसे
Follow us on

नवी दिल्ली : नव्या आर्थिक वर्षात नोकरदारांवर बदललेल्या नियमांचा मोठा परिणाम होणार आहे. आगामी महिन्यात 1 एप्रिलपासून पगारांबाबतच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल होण्याची शक्यत आहे. जर हे बदल लागू झाले, तर तुमच्या पगार खात्यात (Salary account) कमी पैसे येऊ शकतात. कारण मागीलवर्षी संसदेत वेतन नियमावली विधेयक (Code on Wages Bill) मंजूर झालंय. हे विधेयक 1 एप्रिलपासून लागू होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. हे विधेयक लागू झाल्यास खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या खिशावर याचा थेट परिणाम होणार आहे. याचाच हा खास आढावा (New Salary rules in Code on Wages bill may apply from 1 April 2021).

नवं वेतन नियमावली विधेयक पुढील महिन्यात लागू झाल्यास नोकरदारांच्या हातात येणाऱ्या पगाराच्या रकमेवर परिणाम होईल. त्यामुळे सर्व प्रकारच्या कपातीनंतर हातात येणारा पगार कमी होणार आहे. नव्या बिलानुसार कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगार म्हणजेच कॉस्ट टू कंपनीच्या (CTC) 50 टक्के रक्कम बेसिक आणि 50 टक्के भत्ता अशा रुपात द्यावी लागणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या एकूण पगाराची 50 टक्के रक्कम आधीच बेसिक आहे त्यांच्यावर या नव्या नियमांचा काहीही परिणाम होणार नाही. ज्यांची बेसिक सॅलरी एकूण रकमेच्या 30 ते 40 टक्के आहे, त्यांच्या हातात येणाऱ्या पगारात मात्र कपात होईल.

पगाराची नवी व्यवस्था कशी?

जर एखाद्या नोकरदार व्यक्तीचा महिन्याचा पगार (CTC) 10,000 रुपये आहे तर त्याच्या या पगाराची 50 टक्के म्हणजेच निम्मी रक्कम ही बेसिक ठेवावी लागेल. यानुसार त्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार 5 हजार रुपये होईल आणि याच पगाराच्या 12 टक्के म्हणजेच 600 रुपये PF म्हणून कापले जातील. या टप्प्यात कर्मचाऱ्यांच्या पगारातील रक्कम कपात होणार असली तरी ती रक्कम कर्मचाऱ्यांच्याच मालकीची असणार आहे. विशेष म्हणजे इतकीच रक्कम पुन्हा कंपनीलाही यात टाकावी लागणार आहे. त्यामुळे एकूणच कपात होत असली तरी हे नवे नियम कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी फायद्याचे ठरणार आहेत.

तुमच्या हातात किती पगार येणार?

कंपनीने 5 टक्के ग्रॅच्युटीची रक्कम कापली तर 5 हजार रुपयांमधून 250 रुपये ग्रॅच्युटी म्हणून कपात होईल. म्हणजेच 5,000 बेसिक पगारातून नोकरदाराच्या हातात 4150 रुपये शिल्लक राहतील. अशावेळी 10 हजार रुपये पगारवाल्या नोकरदाराच्या हातात 4150 (बेसिक) + 5000 (इतर भत्ते) = 9150 रुपये येतील.

हेही वाचा :

Recruitment 2021 : ‘या’ मोठ्या कंपनीत नोकरी करण्याची नामी संधी; अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस

VIDEO: ‘आमदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री शिवसेनेचा तरी आमची दखल का नाही?’, संतप्त महिलेचा थेट एकनाथ शिंदेंना सवाल

NTPC Recruitment 2021 : 1.2 लाखापर्यंत पगार, इंजिनिअर-केमिस्टसाठी 230 पदांवर भरती, ‘असा’ भरा अर्ज

व्हिडीओ पाहा :

New Salary rules in Code on Wages bill may apply from 1 April 2021