
1 ऑगस्ट 2025 पासून UPI शी संबंधित नवीन नियम लागू होत आहेत. जर तुम्ही Paytm, PhonePe, GPay किंवा इतर कोणत्याही UPI अॅपद्वारे दररोज पेमेंट करत असाल तर हे बदल जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. UPI सिस्टमचे व्यवस्थापन करणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने नवीन मर्यादा निश्चित केल्या आहेत जेणेकरून सिस्टमवरील दबाव कमी होईल. तसेच ऑनलाईन व्यवहार करताना होणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. तर या नवीन नियमानुसार पेमेंट फेल होणे किंवा विलंब यासारख्या समस्या कमी होतील. या बदलांचा महत्त्वाच्या ट्रान्जेक्शनवर परिणाम होणार नाही, परंतु बॅलन्स चेक, स्टेटस रिफ्रेश सारख्या गोष्टींवर निश्चितच मर्यादा लादल्या जात आहेत. NPCI यांच्या नुसार या मर्यादामुळे UPI अधिक सुरळीत आणि विश्वासार्ह होईल, विशेषतः जेव्हा जास्त लोक एकाच वेळी व्यवहार करतात.
थोडक्यात सांगायचे झाले तर हो. तुम्ही दिवसातून एकदा UPI वापरत असलात किंवा 20 वेळा, या मर्यादा सर्वांना लागू होतील. अशातच तुम्ही वारंवार बॅलन्स किंवा स्टेटस तपासले नाही, तर तुमच्यासाठी कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. हे बदल प्रत्यक्षात मोठे ट्रान्जेक्शन करणाऱ्या वापरकर्त्यांना लक्षात घेऊन केले गेले आहेत. कारण यामुळे नकळतपणे सिस्टमवर जास्त भार पडतो.
नाही. पेमेंट मर्यादा पूर्वीप्रमाणेच राहतील – बहुतेक प्रकरणांमध्ये प्रति व्यवहार 1 लाख रुपयांपर्यंत आणि आरोग्यसेवा किंवा शिक्षण यासारख्या काही श्रेणींमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत ट्रान्जेक्शन करता येणार आहे. 1 ऑगस्टच्या अपडेटसह या मर्यादा बदलणार नाहीत.
वापरकर्त्यांना काही करावे लागेल का?
वापरकर्त्यांना काहीही करण्याची गरज नाही. हे नवीन नियम तुमच्या UPI अॅप्सद्वारे आपोआप लागू केले जातील. फक्त मर्यादांवर लक्ष ठेवा जेणेकरून तुम्हाला दिवसा व्यवहार ब्लॉक करण्यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.
व्यापारी आणि बिलर्सवर परिणाम होईल का?
आता ऑटोपे व्यवहार निश्चित वेळेच्या स्लॉटमध्ये होतील, त्यामुळे UPI द्वारे ऑटोमॅटिक कलेक्शन करणाऱ्या व्यवसायांना त्यांच्या वेळेचे पालन करावे लागेल. परंतु बहुतेक वापरकर्त्यांसाठी – मग ते मोबाइल रिचार्ज असो किंवा नेटफ्लिक्ससारखे सबस्क्रिप्शन असो – सर्वकाही पूर्वीसारखेच चालू राहील.