नीता अंबानी यांचा 500 कोटींचा ‘रत्नहार’, शहाजहान आणि इजिप्तच्या राणीशी खास कनेक्शन, काय आहे इतिहास?

नीता अंबानी यांनी मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नात खास 'पन्ना नेकलेस' परिधान केला होता. त्या रत्नहाराने संपूर्ण जगातील लोकांचे डोळे विस्फारले. हिरव्या पाचूचा हा हार जगातील सर्वात मोठ्या पाचूंपैकी एक असल्याचे म्हटले जाते. अंबानी कुटुंबासाठी पाचू रत्न का महत्वाचे आहे? या नेकलेसची खासियत काय आहे?

नीता अंबानी यांचा 500 कोटींचा रत्नहार, शहाजहान आणि इजिप्तच्या राणीशी खास कनेक्शन, काय आहे इतिहास?
nita ambani and Emerald
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jul 23, 2024 | 10:31 PM

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा लग्नसोहळा मोठ्या धुमधडाक्यात संपन्न झाला. गेल्या चार महिन्यापासून हा लग्न सोहळा सुरु होता. जगभरात या लग्नाची जशी चर्चा सुरु होती त्याचप्रमाणे आणखी एका रत्नहाराची लोकांना उत्सुकता होती. तो रत्नहार म्हणजे मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी परिधान केलेला 500 कोटींचा पाचू रत्नहार… त्यांच्या या रत्नहाराच्या चकाकीने संपूर्ण जगाच्या लोकांचे डोळे विस्फारले. नीता अंबानी यांनी लग्नात जो पाचूचा हार घातला त्यातील सर्वात मध्यभागी असलेला पाचू हा जगातील सर्वात मोठ्या पाचूंपैकी एक असल्याचे म्हटले जाते. काय आहे या नेकलेसची खासियत? त्याचे मुघल बादशहा शहाजहान आणि इजिप्तच्या राणी यांचे काय आहे खास कनेक्शन? काय आहे त्याचा इतिहास? हे जाणून घेऊ… भारतामध्ये रशिया, अफगाणिस्तान, युटोपिया, झांबिया, कोलंबिया, पाकिस्तान येथून पाचू येतात. मात्र, पाकिस्तानचे पाचू प्रसिद्ध आहेत. तर, अफगाणिस्तानमधून येणारे पाचू हे अतिशय...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा