AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मद्यपींसाठी मोठा धक्का; आता दारूसाठी मोजावे लागणार जादा पैसे, कुठे किती वाढ?

मद्यपींसाठी मोठी बातमी समोर आली आहे. दारूच्या दरात वाढ झाली आहे, आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

मद्यपींसाठी मोठा धक्का; आता दारूसाठी मोजावे लागणार जादा पैसे, कुठे किती वाढ?
| Updated on: May 15, 2025 | 6:48 PM
Share

मद्यपींसाठी मोठी बातमी समोर आली आहे. दारूच्या दरात वाढ झाली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या उत्पादन शुल्क विभागानं दारूवरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दारूवरील उत्पादन शुल्क वाढल्यामुळे राज्यात सर्वच प्रकारच्या दारूचे दर वाढले आहेत. त्यामुळे आता मद्यपींना दारूसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. उत्पादन शुल्क विभागाच्या या निर्णयामुळे वाइन, स्कॉच आणि बिअर अशा सर्वच प्रकारच्या दारूच्या किंमती वाढल्या आहेत.

ब्लॅक डॉग स्कॉचच्या किंमतीमध्ये मोठी वाढ

स्कॉच प्रेमिंसाठी देखील मोठी बातमी आहे, ब्लॅक डॉग स्कॉचच्या किंमतीमध्ये देखील मोठी वाढ करण्यात आली आहे. ब्लॅक डॉग स्कॉच आवडणाऱ्यांची एक वेगळीच कॅटेगिरी असते. कितीही महाग झाली तरी असे लोक फक्त ब्लॅक डॉग स्कॉचच पितात. आता तुम्ही असा विचार करत असाल की ब्लॅक डॉग स्कॉच महाग झाली तर त्यात काय एवढं? दुसऱ्या प्रकारची स्वस्त स्कॉच देखील पिता येते, मात्र ज्यांना फक्त ब्लॅक डॉग स्कॉचच पसंत आहे, असे लोक कधीही दुसऱ्या प्रकारची स्कॉच खरेदी करण्याच्या भानगडीत पडत नाहीत, वाट्टेल ती किंमत देऊन ब्लॅक स्कॉच घेण्याची त्यांची तयारी असते.

या स्कॉचचं एक वैशिष्ट म्हणजे हिवाळा असो उन्हाळा असो की पावसाळा प्रत्येक ऋतूमध्ये तुम्ही ब्लॅक डॉग स्कॉच पिऊ शकता. दारू पिणं हे शरीरासाठी हानिकारक आहे, मात्र जरी असं असलं तरी देखील मद्यप्रेमी आपल्या ब्रॅण्डच्या दारूसाठी अग्रही असतात, त्यामध्ये ते कोणतीही तडजोड करत नाहीत. त्या ब्रॅण्डच्या दारूची किंमती कितीही वाढली तरी देखील तीच दारू ते जास्त पैसे देऊन खरेदी करतात.

ब्लॅक डॉग स्कॉच किंमतीमध्ये किती वाढ?

उत्तर प्रदेश सरकारच्या उत्पादन शुल्क विभागानं दारूवरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दारूवरील उत्पादन शुल्क वाढल्यामुळे राज्यात सर्वच प्रकारच्या दारूचे दर वाढले आहेत. ब्लॅक डॉग स्कॉचच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. 750ml बाटलीमागे चाळीस रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सुधारीत दरानुसार आता ब्लॉक डॉग स्कॉचच्या 750ml बाटलीची किंमत 1480 रुपये एवढी झाली आहे. तर बॅक डॉग गोल्डच्या एका बाटलीची किंमत 2170 वर पोहोचली आहे.

डिस्क्लेमर- TV9 मराठी कोणत्याही प्रकारे दारू आणि बिअरचा प्रचार करत नाही. हा लेख फक्त तुमच्या माहितीसाठी लिहिला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की दारूचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे.

Follow Us
भरत गोगावले यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार?
Bharat Gogawale | रायगडच्या पालकमंत्रिपदाचा सस्पेन्स संपणार; भरत गोगावले यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार?
शॉर्टकट'चा वापर करु नका', पंतप्रधान मोदींचा Gen-Z तरुणाईला संदेश
PM Modi : 'कधीही 'शॉर्टकट'चा वापर करु नका', पंतप्रधान मोदींचा Gen-Z तरुणाईला खास संदेश
विद्यार्थी घाबरत नाहीत, तुम्हीही घाबरू नका! राहुल गांधींचा मीडियाला...
Rahul Gandhi | विद्यार्थी घाबरत नाहीत, तुम्हीही घाबरू नका! राहुल गांधींचा मीडियाला थेट संदेश, म्हणाले...
मी रोज संसदेत येतो मात्र... गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान
मी रोज संसदेत येतो मात्र... गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान, विरोधकांना केलं चर्चेच आवाहन
कॅब-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास..
कॅब-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास ही चूक पडणार महागात
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी बैठकीत सगळंच सागितलं...
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी सगळंच सागितलं अन् एकनाथ शिंदेंनी दिले कडक निर्देश, थेट मकोका...
3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत...
मराठा आरक्षणावर मोठी अपडेट! 3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत सर्वाधिक वितरण
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज