आता बायको-मुलांच्या खात्यावर पैसे जमा करायलाही परवानगी लागणार

| Updated on: Jul 08, 2019 | 6:16 PM

सध्याच्या युगात बँकिंग व्यवस्थेत सातत्याने बदल होत आहेत. आता सरकार बँकिग व्यवस्थेत आणखी एक मोठा बदल घेऊन येत आहे. त्यानुसार यापुढे तुमच्या परवानगीशिवाय कुणीही तुमच्या खात्यात पैसे जमा करु शकणार नाही.

आता बायको-मुलांच्या खात्यावर पैसे जमा करायलाही परवानगी लागणार
या गाईडलाईन्स पैसे घेणे आणि देण्यासंबंधी तयार करण्यात आल्या आहेत. ज्याने कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मदत होईल.
Follow us on

मुंबई : सध्याच्या युगात बँकिंग व्यवस्थेत सातत्याने बदल होत आहेत. आता सरकार बँकिग व्यवस्थेत आणखी एक मोठा बदल घेऊन येत आहे. त्यानुसार यापुढे तुमच्या परवानगीशिवाय कुणीही तुमच्या खात्यात पैसे जमा करु शकणार नाही. तसेच तुम्हालाही इतर कुणाच्या खात्यात पैसे टाकण्यासाठी परवानगी आवश्यक असणार आहे. हे नियम लवकरच लागू होणार असल्याची माहिती  मिळत आहे.

सरकारने यामागे नोटबंदीनंतर अनेक लोकांनी आपला काळापैसा पांढरा करण्यासाठी नातेवाईकांच्या अथवा कर्मचाऱ्यांच्या खात्यांचा उपयोग केल्याचे कारण दिले आहे. नोटबंदी काळात अनेकांच्या लोकांच्या खात्यात त्यांना माहिती नसतानाच पैसे जमा झाले होते. त्यामुळे अनेक खातेदारांना अडचणींचा सामना करावा लागला होता, असेही सांगण्यात येत आहे. हे टाळण्यासाठीच हा निर्णय घेण्यात येत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यानुसार यापुढे ज्याच्या खात्यात पैसे जमा करायचे आहेत त्याची परवानगी घेणेही आवश्यक असणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 5 जुलै रोजी संसदेत अर्थसंकल्पीय भाषण केले. त्यात त्यांनी या नव्या बदलांविषयी इशारा केला होता. आधीच्या नियमाप्रमाणे कोणतीही व्यक्ती कोणत्याही व्यक्तीच्या बँक खात्यावर पैसे जमा करु शकत होती. त्यासाठी बँकेचा किंवा कॅश डिपॉझिट मशिनचाही वापर केला जात होता. मात्र, यापुढे असे करता येणार नाही.

नव्या नियमांनुसार तुम्हाला ज्या व्यक्तीच्या खात्यावर पैसे जमा करायचे आहेत त्याची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असणार आहे. अगदी मुलगा आणि बायको देखील याला अपवाद नाही. त्यांच्या खात्यात पैसे जमा करायचे असेल तरी परवानगी बंधनकारक असणार आहे.