AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रूड ऑईल बाबत धडकी भरवणारी बातमी; पुन्हा बाजारात हाहा:कार?

मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे ब्रेंट क्रूडची किंमत $100 प्रति बॅरलवर पोहोचली आहे, ज्यामुळे जागतिक बाजारात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. भारतासारख्या मोठ्या तेल आयातदार देशाला याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. यामुळे चालू खाते तुटवडा वाढेल, रुपया घसरेल आणि महागाईचा धोका निर्माण होईल, ज्याचा आरबीआयच्या धोरणांवर परिणाम होईल.

क्रूड ऑईल बाबत धडकी भरवणारी बातमी; पुन्हा बाजारात हाहा:कार?
Brent Crude JumpsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 09, 2026 | 5:45 PM
Share

मध्य पूर्वेतील सैन्य संघर्ष अचानक वाढल्यानंतर 9 सप्टेंबर 2026 पासून ब्रेंट क्रूडच्या किंमती 100 डॉलर प्रति बॅरलवर गेल्या आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात हाहा:कार उडाला आहे. जॉर्डनमध्ये अमेरिकन सैन्य तळावर झालेले हल्ले आणि होर्मुज स्ट्रेट सारख्या सामुद्री मार्गातून होणारा पुरवठा बाधित होण्याच्या शक्यतेने आंतरराष्ट्रीय कमोडिटी एक्सचेंजमध्ये मोठ्या प्रमाणावर जिओपॉलिटिकल रिस्क प्रीमियम जोडला गेला आहे. जगभरातील सुमारे 20 टक्के पेट्रोलियम वाहतूक याच स्ट्रेटमधून होते. त्यामुळे या मार्गातूनच पुरवठा बाधित झाल्याच्या बातम्या आल्याने वैश्विक इक्विटी बाजार, सरकारी बॉन्ड यील्ड आणि करन्सी मार्केटमध्ये खळबळ उडाली आहे. याचाच परिणाम म्हणून कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑईल) किंमती वाढल्या आहेत. कच्चा तेलाचे भाव 100 डॉलर प्रति बॅरल गेले असून त्यामुळे जगाला त्याची झळ पोहोचली आहे.

90 टक्के कच्च तेल (क्रूड ऑईल) विदेशातून खरेदी करणाऱ्या भारतासारख्या प्रमुख एनर्जी इंपोर्टर देशासाठी तेलाचे भाव 100 डॉलर प्रति बॅरलवर जाणं हा मोठा मॅक्रो इकोनॉमिक झटका आहे. कच्च्या तेलाच्या किमती प्रति 10 डॉलर बॅरलने वाढल्याने भारताचे वार्षिक आयात बिल सुमारे 13-15 बिलियन डॉलरने वाढणार आहे. त्यामुळे चालू खाते तुटवडाही (CAD) वाढणार आहे. आणि भारतीय रुपयावर डॉलरच्या तुलनेत मोठा भार येणार आहे. त्याशिवाय इंपोर्टेड फ्यूल हाय कॉस्ट सीपीआय दुसऱ्यांदा वाढण्याची भीती वाढली आहे. त्याचा थेट परिणाम आरबीआयच्या धोरणारवर होऊ शकतो, असं सूत्रांनी सांगितलं.

ब्रेंट क्रूड 100 डॉलर पार

बुधवारी बेंचमार्क ब्रेंट क्रूड आईल फ्यूचर्सच्या किमती 100 डॉलर प्रति बॅरल पार गेल्या होत्या. 24 जुलैनंतर पहिल्यांदा हा महत्त्वाचा टप्पा पार झाला. मध्य पूर्वेत तणाव वाढल्यामुळे या भागात तेल सप्लाय करण्याबाबतची चिंता वाढली आहे. ब्रेंड क्रूड फ्यूचर्स $2.15 वा 2.2 टक्के वाढून 100.07 डॉलर प्रति बॅरल झाले झाले आहे. तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड 1.70 डॉलर वा 1.83 टक्के वााढून 94.73 डॉलर प्रति बॅलरवर गेलं आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीपासूनच ब्रेंटच्या किमतींमध्ये एक चतुर्थांश वाढ झाली आहे. वास्तवात अमेरिका आणि इराण दरम्यान गेल्या सहा महिन्यापासून तणाव वाढलेला आहे. दोन्ही देशातील तणावावर अजून तोडगा निघालेला नाहीये. तसेच तणाव कमी होईल याची शक्यताही मावळली आहे. त्याचा परिणाम थेट कच्च्या तेलाच्या किंमतीवर होत आहे.

किंमती का वाढल्या?

यूएस युद्धनौकांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्याला उत्तर म्हणून वॉशिंग्टनने इराणच्या तेल टँकरवर हल्ला केला. इराण सातत्याने अमेरिकेच्या नौदलाच्या जहाजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येकवेळा इराण असं करत असेल आणि असं करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना त्यांचे टँकर गमवावे लागणारच, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी सांगितलं. तर, गेल्या दोन दिवसांत अमेरिकी नौदलाच्या युद्धनौकेवर क्षेपणास्त्र हल्ल्याच्या प्रयत्नांनंतर, आमच्या सैन्याने 8 सप्टेंबर रोजी इराणच्या पाच कच्च्या तेलाच्या टँकरना नष्ट केले, असं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने स्पष्ट केलं. तर अमेरिकेच्या सरकारी वृत्तसंस्थेने सैन्याच्या हवाल्याने सांगितले की, जॉर्डनच्या हवाई-संरक्षण यंत्रणेने इराणकडून डागण्यात आलेल्या 20 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपैकी 18 क्षेपणास्त्रे रोखली, तर उर्वरित दोन क्षेपणास्त्रे निर्जन भागात कोसळली. यामध्ये कोणीही जखमी किंवा ठार झाल्याचे वृत्त नाही.

Follow Us
दहीहंडी उत्सवात नियमभंग; पुणे नागपुरात 28 जणांवर गुन्हे दाखल
दहीहंडी उत्सवात नियमभंग; पुणे नागपुरात 28 जणांवर गुन्हे दाखल
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या...
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... अमित शहा...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... शहांचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप,
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप, व्हिडीओ व्हायरल
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर...
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर घात केला अन्...
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरे..
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरेंनी थेट...
3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! सामंत, लाडांनी आकडेवारीच सांगितली
Maratha Reservation | मराठवाड्यात 3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! उदय सामंत-प्रसाद लाडांनी आकडेवारीच सांगितली
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली;12 तारखेला अंतरवालीत होणार...
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली; 12 तारखेला अंतरवालीत होणार बैठक
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे...
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंचा व्हिसीद्वारे जबाब
जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा जरांगेंवर घ
Ajay Baraskar | जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा मनोज जरांगेंवर घणाघात