लवकरच 200-500 च्या नव्या नोटा बाजारात, गांधींच्या फोटोत हलका बदल

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) पुन्हा एकदा 200 आणि 500 च्या नवीन नोटा बाजारात आणत आहे. या नव्या नोटा जुन्या नोटांपेक्षा काहीशा वेगळ्या असतील. याबाबत आरबीआयने ट्वीट करत माहिती दिली. याआधीही रिझर्व्ह बँकेने 200 आणि 500 च्या नोटा चलनात आणल्या आहेत. नव्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो नव्या रुपात छापला जाणार आहे. तसेच यावरील सहीही …

लवकरच 200-500 च्या नव्या नोटा बाजारात, गांधींच्या फोटोत हलका बदल

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) पुन्हा एकदा 200 आणि 500 च्या नवीन नोटा बाजारात आणत आहे. या नव्या नोटा जुन्या नोटांपेक्षा काहीशा वेगळ्या असतील. याबाबत आरबीआयने ट्वीट करत माहिती दिली. याआधीही रिझर्व्ह बँकेने 200 आणि 500 च्या नोटा चलनात आणल्या आहेत.

नव्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो नव्या रुपात छापला जाणार आहे. तसेच यावरील सहीही बदलली जाणार आहे. आतापर्यंत चलनामध्ये ज्या 200 आणि 500 रुपयांच्या नोटा आहेत, त्यावर माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची सही आहे. मात्र आता येणाऱ्या नव्या नोटांवर विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सही असेल.

200 आणि 500 च्या नव्या नोटा बाजारात येणार असल्या तरी जुन्या नोटाही सुरु राहणार असल्याचे, आरबीआयने म्हटलं आहे.

नवीन नोटांबद्दल आरबीआयने महत्त्वाची माहिती दिली आहे. नवीन नोटांध्ये काही बदल होणार नाही. फक्त महात्मा गांधी यांच्या फोटोमध्ये बदल होणार आहे. याआधी 50 आणि 100 रुपयांच्या नवीन नोटा सुरु केल्या होत्या. त्यावर सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सही आहे.

दोन वर्षापूर्वी नोटबंदीनंतर आरबीआयकडून 10 रुपयांच्या नोटांपासून 2000 रुपयांपर्यंतच्या नोटा चलनात आणल्या . ज्यामध्ये 2000, 500, 200, 100, 50, 10 रुपयांचा समावेश आहे. नोटाबंदीवेळी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोट रद्द करण्यात आल्या होत्या.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *