AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI ने 42 कोटी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट, आता घर बसल्या मिळणार ‘या’ 9 सुविधांचा लाभ

एसबीआय योनो मोबाईल अॅपद्वारे डोरस्टेप बँकिंग सेवा सुरू करत आहेत. वेब पोर्टल आणि कॉल सेंटर या मोबाईल अ‍ॅपद्वारे या सुविधांचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे.

SBI ने 42 कोटी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट, आता घर बसल्या मिळणार 'या' 9 सुविधांचा लाभ
| Edited By: | Updated on: Jan 24, 2021 | 1:57 PM
Share

मुंबई : देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने त्यांच्या 42 कोटी ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. ग्राहक आता घर बसल्या हँकेत्या 9 सेवांचा लाभ घेऊ शकतात. बँकेने दिलेल्साय माहितीनुसार, एसबीआय योनो मोबाईल अॅपद्वारे डोरस्टेप बँकिंग सेवा सुरू करत आहेत. वेब पोर्टल आणि कॉल सेंटर या मोबाईल अ‍ॅपद्वारे या सुविधांचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. (online sbi start doorstep banking dsb services banking facility here is how it works)

इतकंच नाहीतर, कामकाजाच्या दिवशी, टोल फ्री क्रमांक 1800 1037 188 किंवा 1800 1213 721 वर सकाळी 9 ते संध्याकाळी 4 दरम्यान कॉल करता येईल. एसबीआय डोअरस्टेप बँकिंग सेवांविषयी अधिक माहितीसाठी, ग्राहक https://bank.sbi/dsb वर भेट देऊ शकतात. ग्राहक त्यांच्या गृह शाखेशी संपर्क साधू शकतात.

काय आहे. SBI ची डोअरस्टेप बँकिंग सेवा ?

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, डोअरस्टेप बँकिंगला लाभ घेण्यासाठी ग्राहकांना नोंदणी करावी लागणार आहे. सगळ्यात आधी चेक, डिमांड ड्राफ्ट, वेतन ऑर्डर इत्यादी, फॉर्म 15G/15H , IT/GST चालान, अकाउंट स्टेटमेंट, मुदत ठेव पावती जमा करणं इत्यादी सुविधा यामाध्यमातून देण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर आता बँकेने आर्थिक सेवादेखील सुरू केल्या आहेत. यामध्ये PSBs चे ग्राहक कुठल्याही शुल्काशिवाय या सुविधांचा लाऊ घेऊ शकतात.

SBI ने ग्राहकांसाठी सुरू केल्या या 9 सुविधा

– नकदी प्राप्ति (कॅश पिकअप)

– रोख वितरण (कॅश डिलिव्हरी)

– चेक मिळवणे (पिकअप)

– मागणी स्लिप तपासणे

– फार्म 15H पिकअप

– ड्राफ्ट वितरण

– मुदत ठेव माहिती (सल्ला) आणि वितरण

– जीवन प्रमाणपत्र पिकअप करणे

– केआयसी कागदपत्रांची निवड

या सेवेचा कोण घेऊ शकतं फायदा

एसबीआयच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, नेत्रहीन व्यक्ती आणि अपंग या सुविधेचा फायदा घेऊ शकतात. इतकंच नाहीतर 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिकही या सेवेचा लाभ घेऊ शकतात. (online sbi start doorstep banking dsb services banking facility here is how it works)

संबंधित बातम्या – 

आता 5, 10 आणि 100 च्या जुन्या नोटा होणार बाद, पण त्याआधी वाचा ‘हा’ नियम

‘या’ 3 बँकांमध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, RBI ने केली मोठी घोषणा

Special Story : पैशाला पैसा जोडून बक्कळ कमवाल, गुंतवणुकीआधी लक्षात असूद्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

(online sbi start doorstep banking dsb services banking facility here is how it works)

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ