ट्रॅव्हल एजन्सीचा ‘ग्रोथ गिअर’, शेअर्सवर 183% रिटर्न; गुंतवणुकदार मालामाल

ट्रॅव्हल एजन्सीचा ‘ग्रोथ गिअर’, शेअर्सवर 183% रिटर्न; गुंतवणुकदार मालामाल
Image Credit source: TV9 marathi

ईझी ट्रिप प्लॅनर्सच्या शेअर्सवर एका वर्षात 183 टक्के परतावा मिळाला आहे. आगामी काळात कंपनीला अधिकाधिक नफा मिळण्याची अपेक्षा आहे.

रचना भोंडवे

|

May 26, 2022 | 8:09 PM

नवी दिल्ली: भारतीय ऑनलाईन ट्रॅव्हल कंपनी ‘ईझी ट्रिप प्लॅनर्स’ने (Easy Trip Planners) कमाईचा उच्चांक प्रस्थापित केला आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीने 100 कोटीहून अधिक रुपयांचा नफा प्राप्त केला आहे. कंपनीच्या आर्थिक इतिहासात पहिल्यांदाचा कंपनीच्या गंगाजळीत 72 टक्क्यांहून अधिक भर पडली आहे. कंपनीच्या शेअरधारकांना (Shareholders) बंपर लाभ मिळाला आहे. सर्व गुंतवणुकदारांनी तीन टक्के परताव्याचा लाभ मिळाला आहे. ईझी ट्रिप प्लॅनर्सच्या शेअर्सवर एका वर्षात 183 टक्के परतावा मिळाला आहे. आगामी काळात कंपनीला अधिकाधिक नफा मिळण्याची अपेक्षा आहे. कोविड प्रकोपाच्या (Covid Crisis) काळात ब्रेक बसल्याने पुन्हा नव्यानं व्यवसायाची गाडी रुळावर येण्याची अपेक्षा कंपनीच्या संचालकांनी व्यक्त केली आहे.

ग्रोथ गिअर

कोविड निर्बंध हटल्यानंतर भारतात ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सीनं तेजीचा गिअर टाकला आहे. कंपनीसोबत गुंतवणुकदारांच नशीब उजळलं आहे. कोविड पूर्व काळात ईझी ट्रिप प्लॅनरचा नफा 30-33 कोटी रुपयांच्या घरात होता. कोविडचे निर्बंध हटल्यानंतर कंपनीच्या नफ्यात तीन टक्क्यांची वाढ नोंदविली गेली. कोविडमुळं ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सीचं नशीब पालटलं आहे. एका वर्षात कंपनीच्या स्टॉकने 183 पट नफा मिळाला आहे. सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यतेमुळं ट्रॅव्हल एजन्सीचा सुवर्णकाळ सुरू असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.

गुंतवणुकदाराचं चांगभल:

कंपनीच्या नफ्याचा थेट फायदा शेअरधारकांना मिळाला आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतविणाऱ्यांना तीन टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. सप्टेंबर 2021 मध्ये ईझी ट्रिप प्लॅनरने भारताच्या पहिल्या 100 युनिकॉर्न कंपन्यांत स्थान बळकट केलं होतं. कंपनीनं मार्केट कॅपिटलचा 1 कोटींचा टप्पा पार केला. ट्रॅव्हल कंपनी प्रवाशांच्या हितासाठी नव धोरण हाती घेण्याच्या विचारात आहे. आर्थिक सहाय्य प्रदान करणाऱ्या कंपन्यांशी चर्चा सुरू आहे.

जगभर विस्तार:

ईझी ट्रिप प्लॅनर्स या कंपनीची स्थापना 4 जून 2008 रोजी झाली. ट्रॅव्हल इंडस्ट्रीमधील दुसऱ्या क्रमांकाची आघाडीची कंपनी ठरली आहे. ग्राहकांना संपूर्ण सहलीचे व्यवस्थापन करुन देणं हा कंपनीचा मुख्य व्यवसाय आहे. यामध्ये विमानाची तिकिटे, रेल्वे तिकिटे, बसची तिकिटे, टॅक्सी सेवा, प्रवासी विमा, व्हिसा प्रोसेसिंग आणि इतर कामांसाठी व्हॅल्यू अ‍ॅड सर्व्हिसेसचा समावेश आहे. ईझी ट्रिप प्लॅनर्सने ग्राहकांना 400 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमान सेवा, भारतातील 1,096,400 हून अधिक हॉटेल आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये, जवळजवळ सर्व रेल्वे स्टेशन, तसेच बसची तिकिटे आणि टॅक्सी भाड्याने उपलब्ध करुन दिली आहे.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें