Pakistan Loss : ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान उद्ध्वस्त, 3 दिवसात इतक्या हजार कोटींचे नुकसान

Pakistan Devasted by Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानातील काही शहरांना मोठा फटका बसला. दुसरीकडे आर्थिकदृष्ट्या पाकिस्तानचे कंबरडे मोडले. पाकिस्तानच्या शेअर बाजाराला सर्वात मोठा फटका बसला. पाकिस्तानचे इतक्या कोटींचे नुकसान झाले.

Pakistan Loss : ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान उद्ध्वस्त, 3 दिवसात इतक्या हजार कोटींचे नुकसान
पाकिस्तानचे मोठे नुकसान
Image Credit source: गुगल
| Updated on: May 11, 2025 | 10:25 AM

‘ऑपरेशन सिंदूर’ मुळे पाकिस्तानला जबरदस्त तडाखा बसला. युद्धविरामाला दोन्ही देशांनी मान्यता दिली. शनिवारी संध्याकाळी 5 वाजता दोन्ही देशांनी यु्द्धाला विराम दिला. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला मोठा फटका बसला. कंगाल पाकिस्तानला केवळ शेअर बाजारातूनच 80 हजार कोटींहून अधिकचे नुकसान झाले. तर पाकिस्तानच्या अनेक शहरातील धावपट्ट्या, विमान, ड्रोन, मिसाईल नष्ट झाल्या आहेत. त्यांचे प्राणप्रिय, लाडके दहशतवादी नरकात पोहचले आहेत, हे नुकसान अपरिमित आहे. पाकिस्तान आता किती नुकसान झाले याची मोजदाद करत असल्याची माहिती समोर येत आहे. याविषयीचा अधिकृत आकाडा पाकिस्तान सांगेल का? हा पण प्रश्न आहे.

अनेक अब्ज डॉलरचा फटका

पाकिस्तानच्या पायाभूत सुविधांना मोठा फटका बसला आहे. एअरस्पेस आणि विमानतळ बंद असल्याने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची गती एकदम मंदावली. एका अंदाजानुसार, या सर्व कारावाईत पाकिस्तानला अनेक अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नुकसान झाल्याचे कबूल केले आहे. अर्थात अजून अधिकृत आकडेवारी काही समोर आली नाही. पण पाकिस्तानच्या अर्थव्यवस्था कोलमडली इतके नक्की, आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या विशेष पॅकेजची पाकिस्तान वाट पाहत आहे.

पाकिस्तानी शेअर बाजार कोसळला

ऑपरेशन सिंदूर नंतर कराची स्टॉक एक्सचेंज तीन दिवसांपर्यंत उघडला आणि तीन दिवसात या शेअर बाजाराला मोठे नुकसान सहन करावे लागले. तर 9 मे रोजी IMF च्या बेलआऊट पॅकेजमुळे शेअर बाजारात तेजी दिसून आली. त्यानंतर एकूणच बाजार तीन दिवसात जवळपास 6,400 अंकांनी पडला. 6 मे रोजी पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज 113,568.51 अंकावर बंद झाला. तर त्याच दिवशी रात्री उशीरा ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. 7 मे रोजी कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये 3,559.48 अंकांची घसरण होऊन तो 110,009.03 अंकांवर बंद झाला.

त्यानंतर दोन्ही देशात 8 मे रोजी तणाव वाढला. कराची स्टॉक एक्सचेंजवर दबाव वाढला. 8 मे रोजी 6,482.21 अंकाची घसरण झाली. दोन दिवसात कराची स्टॉक एक्सचेंजला 10,041.69 अंकांचे नुकसान झाले. 9 मे रोजी पाकिस्तानी शेअर बाजारात आयएमएफच्या धोरणानंतर तेजी दिसून आली. बाजार 3,647.82 अंकांच्या तेजीसह 107,174.64 अंकावर बंद झाला. तर तीन दिवसात बाजाराला एकूण
6,393.87 अंकांचे नुकसान झाले.