
5 Online Business Ideas : तुम्ही पण नोकरीला कंटाळला आहात का? ऑफिस पॉलिटिक्स आणि पाचंट लोकांच्या कमेंट ऐकून उपजीविकेचं दुसरं साधन शोधताय का? मग हे व्यवसाय तुम्हाला रात्रंदिवस कमाई करून देतील. तुम्ही झोपलेले असतानाही तुमची कमाई बंद होणार नाही. सध्या जग ऑनलाईन शिफ्ट होत आहे. तर मग तुमचा व्यवसाय ऑनलाईन का शिफ्ट होऊ नाही शकत याविचाराने लाखो व्यावसाय ऑनलाईन आले आहेत. त्याचाच फायदा तुम्हाला घ्यायचा आहे. हे 5 ऑनलाईन बिझनेस तुम्हाला मोठी कमाई करून देतील.
ड्रॉपशिपिंग (Dropshipping)
यामध्ये कोणत्याही मालाची खरेदी न करता ई-कॉमर्स व्यवसाय करता येतो. जर तुम्ही शॉपिंग साईट चालवत असाल तर तर स्टॉक आणि डिलिव्हरीची चिंता करायची गरज नाही. त्यासाठी ड्रॉपशिपिंग चांगला पर्याय आहे. Shopify वा WooCommerce सारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला एक ऑनलाईन स्टोअर सुरू करावे लागते. यामध्ये प्रोडक्ट्सची यादी करावी लागते. ग्राहकाने ऑर्डर केल्यावर थर्डपार्टी माल पोहचवते आणि कमाई तुमच्या खात्यात येते.
डिजिटल प्रोडक्ट्स (Digital Products)
तुम्ही अर्थ, शारीरिक तंदुरुस्ती, शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास वा इतर क्षेत्रातील तज्ज्ञ असाल तर त्याचे ई-बुक तयार करा, ऑनलाईन कोर्स तयार करुन तो विका. एकदा हा कटेंट तयार झाला की हा कंटेंट तुम्हाला कमाईची संधी देईल. Notion, Canva वा Google Docs च्या मदतीने डिजिटल प्रोडक्ट तयार करता येतात. ते Gumroad, Payhip वा Udemy या सारख्या प्लॅटफॉर्मवर विक्री करता येते.
ॲफिलिएट मार्केटिंग(Affiliate Marketing)
घर बसल्या कमाईसाठी ॲफिलिएट मार्केटिंग हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. तुम्ही काही ब्रंड्सच्या प्रोडक्टसची लिंक तुमचा ब्लॉग, युट्यूब चॅनल,सोशल मीडिया वा WhatsApp ग्रुपवर शेअर करु शकता. त्याआधारे शॉपिंग झाल्यावर चांगले कमीशन मिळते. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट वा इतर साईट्स त्यासाठी चांगले कमीशन देतात.
डिझाईन विका, पैसे कमवा (Print on Demand)
तुम्हाला डिझाई तयार करण्याची आवड असेल तर मग टी-शर्ट डिझाईन,पोस्टर, कॉफी मग, मोबाईल कव्हरवर प्रिंट ऑन डिमांड (POD) तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.प्रिंटिफाय (Printify), झैझल (Zazzle) वा टीस्प्रिंग (Teespring) सारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे डिझाईन अपलोड करुन विक्री करू शकता. तुम्ही डिझाईन बंडल तयार करुन ऑनलाईन विक्री करु शकता.
स्टॉक कंटेंट विक्री (Sell Stock Content)
जर तुम्ही फोटोग्राफर, संगीतकार अथवा व्हिडिओग्राफर असाल तर Shutterstock, Adobe Stock, वा Pixabay सारख्या प्लॅटफॉर्म आधारे तुमची क्रिएटिव्हीटी तुम्हाला दाखवता येईल. युझर्सने तुमचा फोटो वा ऑडिओ, व्हिडिओ खरेदी केला तर त्याची रक्कम तुम्हाला मिळेल. एआय टुल्सचा वापर करून सुद्धा तुम्हाला कंटेंट विक्री करता येईल.