पतंजलीचा रिटेलच नाही तर होलसेल बिजनेसमध्येही दबदबा, हे प्रोडक्ट्स विकते
बाबा रामदेव यांची कंपनी 'पतंजली' या ब्रँडखाली अनेक प्रकारची किरकोळ उत्पादने विकते, पण तुम्हाला माहिती आहे का की त्यांच्या कंपनी पतंजली फूड्सच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक घाऊक उत्पादने आहेत, ज्यात कंपनीचे बाजारात वर्चस्व आहे...

तुम्ही ‘पतंजली’ ब्रँड नावाचे दंत कांती, गुलाब शरबत, गायीचे तुप वा मधासारख्या प्रोडक्टबद्दल बरेच ऐकले असेल. हे सर्व प्रोडक्ट बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली फूड्सचे रिटेल प्रोडक्ट्सचा पोर्टफोलिओ आहे, परंतू तुम्हाला हे माहीती आहे का त्यांची पतंजली फूड्स ही कंपनी होलसेल मार्केटमध्ये दबदबा असलेले हे सर्व प्रोडक्ट बनवतेही, तसे पाहीले तर B2B सेगमेंटमध्ये या प्रोडक्ट्समध्ये त्यांची कंपनी मार्केट लीडर आहे.
साल २०१९ मध्ये बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आयुर्वेदने मध्य प्रदेशची प्रमुख कंपनी रुची सोया इंडस्ट्रीजचे अधिग्रहण केले. यानंतर पतंजली ग्रुपचा एफएमसीजी कारभार हळूहळू या कंपनीकडे सोपवला गेला आणि पतंजली फूड्स नावाची नवीन कंपनी तयार झाली. परंतू रुची सोयाचा होलसेल बिझनेस आधीच्या प्रमाणात वाढत आहे.
रुची सोया इंडस्ट्रीज ही देशाची सुरुवातीची पहिली अशी कंपनी होती जिने देशात सोयाबीन खाद्य तेल बनवणे सुरु केले. या कंपनीने देशात पहिल्यांदा सोयाबीन प्रोसेसिंग यूनिट बनविली. तसेच सोयाबीनचे बायप्रोडक्ट बनविणे सुरु केले. कंपनीचा ‘महाकोश’ ब्रँड सोयाबीन तेल आधीच लोकांमध्ये ओळख ठरलेला आहे. तर Nutrela ब्रँड नावाने कंपनी सोया वडी आणि अन्य सोया प्रोडक्ट्सचा रिटेल कारभार सुरु आहे.
होलसेल कारभारात कंपनीचा दबदबा
आता पतंजली फूड्स बनलेली ही कंपनी रुची सोया इंडस्ट्रीज देशातील सर्वात मोठी सोया एग्री बिझनेस कंपनी आहे. सोयाबिनच्या मॅक्सिमम युटिलायझेशनमध्ये कंपनीने प्राविण्य मिळविले आहे.देशभरात कंपनीचे १० एडव्हान्स क्रशिंग प्लांट आहे. तर ४ मोठ्या रिफायनरी आहेत. हीने २०२० पासून रिटेल सेक्टरमध्ये आपला Nutrela ब्रँड मजबूत करणे सुरु केले. तसेच सोयाचे अनेक बायप्रोडक्टला कंपनी दुसऱ्या इंडस्ट्रीजला बी2बी अंतर्गत विकत आहे.ही सोया प्रोडक्ट कंफेक्शनरी पासून हेल्थ सप्लीमेंट्स पर्यंत वापरली जाते. याची यादी मोठी आहे.
सोया फ्लेक टोस्टेड: सोया फ्लेक्स एक प्रोटीन रिच आणि लो फॅट प्रोडक्ट आहे. तसचे या बेक्ड फूडचा टेक्चर आणि स्वाद वाढविण्यास मदत करतो. सोया सॉस बनविण्यासाठी कच्चा माल म्हणून वापरला जातो.
सोया फ्लेक अनटोस्टेड : यात सोया फ्लेक्सचा नॅचरल फ्लेवर असतो.या उपयोग सर्वसाधारणपणे नाश्त्याचे प्रोडक्ट उदा.सीरियल वा स्नॅक्स बनविण्यासाठी होतो.
सोया फ्लोअर : हे सोयाबीनचे पीठ असून ते आजकल डायबिटिक रुग्णांच्या जेवणासाठी खास करुन वापरले जाते. यात 52 टक्के प्रोटीन आणि खूपच कमी प्रमाणात फॅट असते,त्यामुळे हेल्थ सप्लीमेंट्समध्ये याचा वापर धडाक्यात होत आहेत.
सॉय लेशिथिन : हे एक असे प्रोडक्ट आहे ज्याचा वापर बिस्कीट, चॉकलेट, बेकरी, कँडी, डेअरी प्रोडक्ट, सॅलेड ड्रेसिंग, मेयोनीज यासह आईसिंग आणि फ्रॉस्टिं इंडस्ट्रीजमध्ये होतो. हा सॉफ्ट जेल आणि जनवरांसाठी न्यूट्रिएंट सप्लीमेंट म्हणून वापरले जाते.
याशिवाय कंपनी फुल-फॅट सोया फ्लोअर, सोयाबीनचा दलिया सारखा दिसणारा सॉय ग्रिट आणि टेक्सचर्ड सॉय प्रोटीन देखील तयार करते.
