पतंजलीचे मोठे GST गिफ्ट, दंत कांतीपासून ते केश कांतीपर्यंत सर्वकाही स्वस्त, तब्बल इतके कमी झाले दर

पतंजलीने ग्राहकांना दिलासा देत त्यांच्या अनेक प्रमुख उत्पादनांच्या किंमती कमी केल्या आहेत. सरकारने अलिकडेच जीएसटी दरांमध्ये केलेल्या बदलांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वस्तामध्ये वस्तू मिळणार आहेत.

पतंजलीचे मोठे GST गिफ्ट, दंत कांतीपासून ते केश कांतीपर्यंत सर्वकाही स्वस्त, तब्बल इतके कमी झाले दर
Patanjali
| Updated on: Sep 22, 2025 | 2:20 PM

पतंजली फूड्स लिमिटेडने त्यांच्या उत्पादनांच्या किंमती कमी करत असल्याची मोठी घोषणा केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, सरकारने काही वस्तूंवरील जीएसटी कमी केला आहे आणि आता ग्राहकांना त्याचा पूर्ण फायदा मिळेल. अनेक पतंजलीच्या वस्तूंच्या किंमती कमी झाल्या आहेत. नवीन किंमती 22 सप्टेंबर म्हणजे आजपासून लागू झाल्या आणि त्यात अन्न आणि पेयांपासून ते औषधे, साबण, तेल आणि सौंदर्यप्रसाधनांपर्यंत सर्व काही समाविष्ट असेल. याचा अर्थ असा की अनेक लोकप्रिय पतंजली उत्पादने आता स्वस्त दरात ग्राहकांना मिळतील.

खाद्यपदार्थांवरील किंमती कमी

तुम्ही पतंजलीचे सोया उत्पादने वापरत असाल तर आता तुम्हाला ती कमी किंमतीत मिळतील. न्यूट्रेला आणि सोयम्म ब्रँडच्या 1 किलोच्या पॅकची किंमत 10 ते 20 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. बिस्किटेही स्वस्त झाली आहेत. दुधाचे बिस्किटे, मेरी बिस्किटे, नारळाच्या कुकीज आणि चॉकलेट क्रीम बिस्किटांच्या किंमती 50 पैशांनी तर 3 रूपयांपर्यंत करण्यात आल्या. मुलांमध्ये लोकप्रिय असलेल्या ट्विस्टी टेस्टी नूडल्स आणि आटा नूडल्सच्या किंमतीही कमी करण्यात आल्या आहेत. आता हे दोन्ही पदार्थ 1 रुपयांपर्यंत कमी किंमतीत उपलब्ध आहेत.

दात आणि केसांची काळजी परवडणारी 

पतंजलीची दंत कांती टूथपेस्ट आता 14 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मूळ किंमत 120 रुपये होती, ती आता 106 रुपये करण्यात आली.  अॅडव्हान्स्ड आणि ओरल जेल सारख्या इतर दंत कांती प्रकार देखील कमी किंमतीत उपलब्ध असतील. केश कांती शाम्पू आणि आवळा हेअर ऑइलच्या किंमतीतही कपात करण्यात आली आहे. शाम्पूच्या किंमतीत 11 ते 14 रुपयांची कपात करण्यात आली आणि तेलाच्या किंमतीत सुमारे 6 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

आयुर्वेदिक उत्पादनांवरही सवलत

पतंजलीच्या आयुर्वेदिक आणि आरोग्यदायी उत्पादनांच्या किंमतीही कमी करण्यात आल्या आहेत. जसे की, आवळा रस, गिलॉय रस, कारल्या-जामुन रस आणि बदाम पाक. च्यवनप्राशची 1 किलोचा पॅक आता 360 रुपयांऐवजी 337 रुपयांना मिळेल. तुपाच्या किंमतीतही मोठी घट करण्यात आलीये. 900 मिली गाईच्या तुपाच्या पॅकची किंमत, ज्याची किंमत पूर्वी 780 होती, ती आता 731 करण्यात आली. 450 मिली पॅकवर देखील अंदाजे 27 टक्के सूट आहे.

आता स्वच्छता देखील स्वस्त 

पतंजलीचे कडुलिंब आणि कोरफडीचे साबण आता 1 ते 3 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. 25 रुपयांना मिळणारे साबण आता 22 रुपयांना मिळत आहेत. आता 9 रुपयांमध्ये छोटे पॅक देखील उपलब्ध आहेत.

आम्ही योग्य किंमतीत चांगले उत्पादन देऊ- पतंजली

सरकारच्या कर कपातीचा पूर्ण फायदा ग्राहकांना मिळावा म्हणून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे पतंजली फूड्सचे म्हणणे आहे.कंपनीने आश्वासन दिले आहे की, ते परवडणारी आणि शुद्ध उत्पादने देण्याच्या आपल्या वचनाचे पालन करत राहतील.

Follow Us