AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वामींचा आशीर्वाद! ‘देऊळ बंद 2’ने कमावला बंपर नफा; ‘राजा शिवाजी’, ‘दृश्यम 3’लाही टाकलं मागे

Deool Band 2 Profit : प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत सर्वाधिक नफा कमावला आहे. याबाबतीत 'राजा शिवाजी', 'दृश्यम 3' यांसारख्या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे.

स्वामींचा आशीर्वाद! 'देऊळ बंद 2'ने कमावला बंपर नफा; 'राजा शिवाजी', 'दृश्यम 3'लाही टाकलं मागे
देऊळ बंद 2Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 19, 2026 | 8:31 AM
Share

मे महिन्यात बॉक्स ऑफिसवर एकापेक्षा एक दमदार चित्रपट प्रदर्शित झाले. विविध भाषांमधील या चित्रपटांमध्ये ‘करुप्पू’, ‘राजा शिवाजी’, ‘दृश्यम 3’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश होता. या तिन्ही चित्रपटांनी मिळून 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. मात्र मे महिन्यातील टॉप 5 चित्रपटांमध्ये नफ्याच्या टक्केवारीच्या बाबतीत एका कमी बजेटच्या मराठी चित्रपटाने सर्वांना मागे टाकलं आहे. हा चित्रपट दुसरा-तिसरा कोणता नसून प्रवीण तरडेंचा ‘देऊळ बंद 2’ हा आहे. हा सर्वाधिक नफा कमावणारा मराठी चित्रपट ठरला आहे. ओरमॅक्स मीडियाने मे महिन्यातील टॉप 5 चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. या यादीत सूर्या आणि त्रिशा कृष्णनची मुख्य भूमिका असलेला ‘करुप्पू’ 229 कोटी रुपयांच्या कमाईसह पहिल्या क्रमांकावर आहे.

मोहनलाल यांचा ‘दृश्यम 3’ हा चित्रपट 133 कोटी रुपयांच्या कमाईसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने 113 कोटी रुपयांची कमाई करत तिसरं स्थान पटकावलं आहे. या यादीत एका हॉलिवूड हॉरर चित्रपटाचाही समावेश आहे. या चित्रपटाने जगभरासह भारतातही धुमाकूळ घातला आहे. 102 कोटी रुपयांची कमाई करून हा हॉरर चित्रपट चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट 90 कोटी रुपयांच्या कमाईसह पाचव्या स्थानी आहे.

‘देऊळ बंद 2’ने कमावला तब्बल इतका नफा

बॉक्स ऑफिसवर नफा कमावण्याच्या बाबतीत प्रवीण तरडेंचा ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट आघाडीवर आहे. अवघ्या 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 90 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अजूनही थिएटरमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. ‘देऊळ बंद 2’ने बजेटवर आतापर्यंत तब्बल 800% नफा कमावला आहे. दरम्यान ‘करुप्पू’ या दाक्षिणात्य चित्रपटाने 76.15 टक्के नफा आपल्या नावे केला आहे. 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 229 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा बजेट 75 कोटी रुपयांचा होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 113 कोटी रुपये कमावून 50.67% नफा मिळवला आहे. तर 100 कोटी रुपयांच्या बजेटमधील सस्पेन्स थ्रिलर ‘दृश्यम 3’ने 133 कोटी रुपये कमावून 33 टक्के नफा मिळवला आहे.

‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट 21 मे 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात मोहन जोशी, स्नेहल तरडे, प्रवीण तरडे, महेश मांजरेकर आणि प्रसाद ओक यांच्या भूमिका आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?