
बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली फूड तिच्या गुंतवणूकदांना बंपर बोनांजा देणार आहे. कंपनीने गुरुवारी बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मिटींगमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. बोर्डाने २:१ च्या प्रमाणात बोनस शेअर देण्याची शिफारस केली आहे. म्हणजे ज्या शेअरधारकांच्या जवळ कंपनीचा १ शेअर ( २ रुपये किंमतीचे ) आहे. त्यांना दो नवीन शेअर ( २ रुपये किंमतीचे ) मोफत दिले जातील.
ही बोनस शेअर योजना शेअरधारकांच्या मंजूरीवर अवलंबून असणार आहे.यासाठी कंपनी आपल्या रिझर्व्हचा वापर करणार आहे. कंपनी लवकरच रिकॉर्ड डेट घोषीत करणार आहे. म्हणजे ती तारीख ज्या दिवसांपर्यंत शेअरधारकांचे नाव कंपनीच्या रेकॉर्डला असणे गरजेचे आहे. म्हणजे त्यांना बोनस शेअर मिळू शकणार आहेत.
या योजनेअंतर्गत कंपनी सुमारे ७२,५०,१२,६२८ नवीन शेअर खरेदी करेल. बोनसनंतर कंपनीचे एकूण शेअर कॅपिटल १४५ कोटीवरुन वाढून २१७.५० कोटी होणार आहे. ३१ मार्च २०२५ च्या बॅलन्सशिटनुसार कंपनीजवळ या बोनस इश्यूसाठी पर्याप्त रिझर्व्ह आहे. कंपनीचे कॅपिटल रिडेम्पशन रिझर्व्ह २६६.९३ कोटी, सिक्युरिटीज प्रीमियम ४७०४.३७ कोटी आणि जनरल रिझर्व्ह ४१८.१५ कोटी आहे. बोर्ड मिटींगच्या दिवसापासून दोन महिन्यांच्या आतत योग्य शेअरधारकांच्या खात्यात बोनस शेअर मिळतील. हे पाऊल सध्याच्या शेअरधारकांना फायदा पोहचवण्याबरोबरच बाजारात कंपनीच्या शेअरची लिक्वीडिटी वाढवण्यासाठी उचलले आहे.
बोनस शेअर ते अतिरिक्त शेअर असतात जे कंपनी आपल्याय सध्याच्या शेअरधारकांना मोफत देते. हे शेअर कंपनीच्या रिझर्व्हमधून दिले जातात. यामुळे कंपनीच्या एकूण शेअरची संख्या वाढते आणि शेअरच्या किंमतीच्या प्रमाणात कमी होतात, परंतू कंपनीची एकूण व्हॅल्यू तिच राहाते. यामुळे कंपनीची चांगली आर्थिक स्थिती आणि शेअरधारकांना भेट देण्याचा संकेत मानला जातो.
मार्च २०२५ च्या तिमाहीचे निकाल
मार्च २०२५ च्या तिमाहीत पतंजली फूड्सचे स्टँडअलोन नेट प्रॉफीट ७४ टक्के वाढून ३५८.५३ कोटी झाले आहे. जे गेल्या वर्षी याच तिमाहीत २०६.३१ कोटी होते. कंपनीची ऑपरेशनल उत्पन्न वाढून ९,७४४.७३ कोटी झाले आहे. गेल्यावर्षी हे ८,३४८.०२ कोटी होते. संपूर्ण आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कंपनीचे नेट प्रॉफिट १,३०१.३४ कोटी राहीले, जे गेल्या वर्षी ७६५.१५ कोटीहून अधिक होते. एकूण उत्पन्न ३४,२८९.४० कोटी होते, गेल्यावर्षी ते ३१,९६१.६२ कोटी होते.
गेल्या एक वर्षात पतंजली फूड्स कंपनीचा शेअर १९ टक्क जास्त वाढला आहे आणि आताही तो १,८६२.३५ रुपयांवर चालू आहे. तरीही तो त्याच्या ५२ आठवड्याच्या उच्च स्तर २,०३० रु.( सप्टेंबर २०२४ ) पासून ८ टक्के खाली आला आहे. जुलै २०२४ मध्ये याने ५२ आठवड्यातील खालची पातळी १,५४१ रुपयांवर होती.