पतंजलीचा महसूल २४ टक्के वाढून ८,८८९ कोटींवर पोहचला, शेअरधारकांना मिळणार २ रुपये प्रति शेअर लाभांश

जून २०२५ तिमाहीचे निकाल जारी करण्यासोबतच पंतजली फूड्सने आर्थिक वर्षे २०२५ साठी घोषीत केले गेलेले २ रुपये प्रति शेअरचा अंतिम लाभांशाचा रेकॉर्ड डेट देखील निश्चित केली आहे.

पतंजलीचा महसूल २४ टक्के वाढून ८,८८९ कोटींवर पोहचला, शेअरधारकांना मिळणार २ रुपये प्रति शेअर लाभांश
patanjali baba ramdev
| Updated on: Aug 14, 2025 | 8:41 PM

पतंजली फूड्स लिमिटेडने (PFL) ३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. कंपनीच्या मते या दरम्यान महागाई दर घटून जूनमध्ये २.१ टक्क्यांवर आला आहे. जो गेल्या तीन वर्षांतील निच्चांक आहे. तरीही शहरी बाजाराती कमजोर मागणी आणि क्षेत्रीय आणि नव्या D2C ब्रांड्सच्या वाढत्या प्रतिस्पर्धेमुळे वातावरण आव्हानात्क राहीले. जमेची बाब म्हणजे ग्रामीण भागातील मागणी शहरांच्या तुलनेत चांगली काम केले आहे.

कंपनीचा ऑपरेशन्स महसूल  ८,८९९.७० कोटी रुपये आला आहे. गेल्या तिमाहीत याच काळात ७,१७७.१७ कोटी रुपये महसूल मिळालेला आहे. त्यामुळे कंपनीचा ग्रॉस प्रॉफीट १,२५९.१९ कोटी रुपये आला आहे. जो वर्षे दर वर्षे २३.८१ टक्क्यांची वाढ आहे.कंपनीचा प्रॉफीट ऑफ्टर टॅक्स ( PAT ) १८०.३९ कोटी रुपये राहीला, ज्याचे मार्जिन २.०२ टक्के आहे.

या सेक्टरमधून पतंजलीची कमाई

पतंजली फूड्स लिमिटेडचे जून तिमाहीचे निकालात कंपनीने एकूण ८,८९९.७० कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे. यात फूड एंड अदर
FMCG सेगमेंटमध्ये १६६०.६७ कोटी रुपये, होम एंड पर्सनल केअर सेगमेंटमध्ये ६३९.०२ कोटी रुपये आणि खाद्य तेलाच्या सेगमेंटमध्ये ६,६८५.८६ कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला.

ग्राहकांच्या खरेदीदाराचा कल

शहरी ग्राहकांत स्वस्त वा छोटे पॅक घेण्याची प्रवृत्ती वाढली आहे. क्षेत्रीय ब्रँडच्या कडे कल देखील पाहायला मिळाला. कंपनीने छोटे पॅक आणि व्हॅल्यू प्रोडक्ट्सद्वारे या ट्रेंडचा फायदा घेतला. ज्यामुळे खाद्य उत्पादनात व्हॅल्युम ग्रोथचे संकेत मिळाले. “समृद्धी अर्बन लॉयल्टी प्रोग्रॅम” सारख्या पावलांनी रिपीट ऑर्डर आणि ब्रँडची उपलब्धता वाढवली आहे.

FY25 च्या लांभाशांची रेकॉर्ड तारीख निश्चित

जून २०२५ च्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्यासोबतच पतंजली फूड्सने आर्थिक वर्षे २०२५ साठी घोषीत केलेले २ रुपये प्रति शेअरचे अंतिम लाभांशाचे रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे.ही तारीख ३ सप्टेंबर २०२५ आहे. या तारखेपर्यंत ज्या शेअरधारकांची नावे शेअरच्या लाभार्थी मालक म्हणून रजिस्टर ऑफ मेंबर्स ऑफ दि कंपनी वा डिपॉझिटरीजच्या रेकॉर्ड्समध्ये असतील, तेच हा लाभांश मिळण्यास प्राप्त असतील. याचा अर्थ शेअर होल्डर्सना त्यांच्याकडील असलेल्या प्रत्येक १ शेअरवर २ नवीन शेअर बोनस म्हणून मिळतील. बोनस इश्यूसाठी रेकॉर्ड डेट अजून निश्चित झालेली नाही.