AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Penny Stock Return : पेन्नी स्टॉकने गुंतवणूकदारांचे महागडे स्वप्न केले साकार, कोणत्याही ईएमआयशिवाय घेतले घर आणि कार

Penny Stock Return : हा पेन्नी स्टॉक गुंतवणूकदारांसाठी पैशांचे झाड ठरला आहे. गुंतवणूकदारांनात त्यांचे घर, कारचे स्वप्न साकारण्यासाठी कर्जाचा हप्ताही फेडावा लागला नाही, इतकी छप्परफाड कमाई झाली आहे.

Penny Stock Return : पेन्नी स्टॉकने गुंतवणूकदारांचे महागडे स्वप्न केले साकार, कोणत्याही ईएमआयशिवाय घेतले घर आणि कार
| Updated on: Mar 28, 2023 | 8:11 PM
Share

नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) कोणता शेअर तुमचे नशिब उघडेल, हे सांगताच येत नाही. तर काही स्टॉक तुम्हाला पार खड्यात घालतील हे पण सांगता येत नाही. स्टॉक मार्केटमधील काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना (Investors) मालामाल केले आहे. तुम्हाला पण या स्टॉकविषयी कळल्यानंतर विचार येईल की वेळीच हा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओत असता तर त्यांना जबरी फायदा झाला असता. हा पेन्नी स्टॉक (Penny Stock) गुंतवणूकदारांसाठी पैशांचे झाड ठरला आहे. गुंतवणूकदारांनात त्यांचे घर, कारचे स्वप्न साकारण्यासाठी कर्जाचा हप्ताही फेडावा लागला नाही, इतकी छप्परफाड कमाई झाली आहे.

मल्टिबॅगर स्टॉक

शेअर बाजारात काही छोटा पॅकेट, बडा धमाका असतात. त्यांच्यावर काहीचे नशिब अगदीच फळफळतं. छप्परफाड परतावा देणाऱ्या शेअरमध्ये राज रयॉन इंडस्‍ट्रीज (Raj Rayon Industries) या शेअरचा क्रमांक लागतो. दोन वर्षांपूर्वी या कंपनीचे 5 शेअर्सची किंमत अवघी 1 रुपया होती. पण आता या शेअरची किंमत 67.45 रुपये झाली आहे. केवळ दोन वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना 33625 टक्के परतावा दिला आहे. त्यामुळे अनेकांना त्यांची महागडी स्वप्न साकारता आली आहे.

84 टक्के फायदा

2 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली. त्यांचा आज मोठा फायदा झाला आहे. दोन वर्षांपूर्वी काही पैशांत त्यांनी हा स्टॉक खरेदी केला. राज रेयॉनच्या शेअरमध्ये केवळ 30 हजार रुपये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. ते आज कोट्याधीश झाले आहेत. गेल्या एका वर्षांत या शेअरने त्यांना मोठा परतावा दिला आहे. हा शेअर मल्टिबॅगर ठरला आहे. या शेअरने 3,891 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तर या वर्षात, 2023 मध्या आतापर्यंत या शेअरने जवळपास 84 टक्के फायदा करुन दिला आहे.

5 वर्षांत तर मोठी उसळी

राज रेयॉन कंपनीच्या शेअरमध्ये पाच वर्षांपूर्वी ज्यांनी गुंतवणूक केली. त्यांना तर आज मोठा फायदा झाला. या पाच वर्षांत हा मल्टिबॅगर स्टॉक 16,862 टक्के पुढे गेला. पाच वर्षांत या शेअरची किंमत केवळ 40 पैसे होती. गेल्या महिनाभरात हा स्टॉक 15 टक्के घसरला आहे. पण दरवाढीचा विचार करता, पाच, दोन वर्षांपूर्वी गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फायदा झाला आहे.

1 लाखांचे झाले 33 कोटी

दोन वर्षांपूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी राज रेयॉनमध्ये गुंतवणूक केली ते आज मालामाल झाले आहेत. या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवणारे आज कोट्याधीश झाले आहेत. 3,37,25,000 इतके आजचे त्यांच्या शेअर्सचे मूल्य आहे. 2 वर्षांपूर्वी त्यांना 1 लाख रुपयांमध्ये 5 लाख शेअर्स केवळ 20 पैसे प्रति शेअरच्या हिशेबाने मिळाले होते. आज एका शेअरची किंमत 67.45 रुपये आहे. तर काही गुंतवणूकदारांनी दोन वर्षांपूर्वी 30 हजार रुपये गुंतवले असते तर आज त्यांना 1,01,17,500 रुपयांचा परतावा मिळाला असता.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.