आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले, भारतीय पेट्रोलियम कंपन्या काय करणार, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा भाव

| Updated on: Sep 14, 2021 | 7:08 AM

Petrol and Diesel | भारताने मुक्त बाजारपेठेचे धोरण स्वीकारल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठे आणि परदेशी एक्स्चेंजच्या दरांनुसार भारतात इंधनाचे दर निश्चित केले जातात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या दरात वाढ झाल्यास भारतामध्येही त्याचा परिणाम होणे, क्रमप्राप्त आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले, भारतीय पेट्रोलियम कंपन्या काय करणार, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा भाव
पेट्रोल-़डिझेल
Follow us on

मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाचे दर सातत्याने वाढत असल्याने भारतामध्येही त्याचे पडसाद उमटणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, मंगळवारी सलग नवव्या दिवशी भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. भारताने मुक्त बाजारपेठेचे धोरण स्वीकारल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठे आणि परदेशी एक्स्चेंजच्या दरांनुसार भारतात इंधनाचे दर निश्चित केले जातात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या दरात वाढ झाल्यास भारतामध्येही त्याचा परिणाम होणे, क्रमप्राप्त आहे.

गेल्या आठ दिवसांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107.26 रुपये तर एका लीटल डिझेलसाठी 96.19 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.19 आणि 88.62 रुपये इतका आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

इंधनाचे दर वाढल्याने मोदी सरकारची चांदी

देशभरात इंधन दरवाढीमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. मात्र, हा काळ केंद्र सरकारसाठी सुगीचा ठरताना दिसत आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलवरील करांच्या माध्यमातून केंद्र सरकारला मिळणाऱ्या महसूलात घसघशीत वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांमध्येच इंधनावरील अबकारी करातून (Excise Duty) मिळणाऱ्या महसूलात तब्बल 48 टक्के वाढ झाली आहे.

केंद्र सरकारला तेल रोख्यांचे पैसे अदा करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर खर्च करावा लागत आहे. मात्र, यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांत कराच्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न या देयकांच्या तीनपट इतके आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या माहितीनुसार, एप्रिल ते जुलै या काळात अबकारी कराच्या माध्यमातून सरकारला एक लाख कोटीहून अधिकचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्यावर्षी हाच आकडा 67,895 कोटी रुपये इतका होता.

संबंधित बातम्या:

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव पुन्हा कडाडले, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

पेट्रोल-डिझेल चढ्या दरात विकून इंडियन ऑईलने किती नफा कमावला?

Fuel Price Hike: केंद्र सरकारने वर्षभरात पेट्रोल-डिझेलवरील कर वाढवला नाही, मग 32 रुपयांची दरवाढ कशी झाली?

(Petrol and Diesel rates in country Today)