AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price : निवडणुकांचे पडघम! आता पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?

Petrol Diesel Price : देशात निवडणुकांचा हंगाम आला आहे. काही राज्यांमध्ये यावर्षाच्या अखेरीस मोठी उलथापालथ होऊ शकते. तर पुढील वर्षी लोकसभा निवडणूक 2024 होणार आहे. त्यामुळे आता नागरिकांवर सवलतींचा पाऊस पडणार आहे. त्याला गॅस सिलेंडरच्या किंमती कमी करुन सुरुवात झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती पण कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Petrol Diesel Price : निवडणुकांचे पडघम! आता पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?
| Updated on: Aug 30, 2023 | 2:39 PM
Share

नवी दिल्ली | 30 ऑगस्ट 2023 : रक्षा बंधन सणाच्या पूर्वसंध्येवर केंदातील नरेंद्र मोदी सरकारने (Narendra Modi Government) जनेतला मोठी भेट दिली. केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमतीत 200 रुपयांची कपात केली. गेल्या काही वर्षात एलपीजी सिलेंडर 450 रुपयांहून थेट 1150 रुपयांच्या घरात पोहचले. गेल्या काही वर्षात घरगुती सिलेंडरचा भाव गगनाला भिडला. त्यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडले. त्यातच गेल्या दोन महिन्यांपासून तर भाजीपाला, डाळींनी पण उरलीसुरली कसर भरुन काढली. पण केंद्राने सिलेंडरच्या दरात 200 रुपयांची कपात केली. निवडणुकींच्या तोंडावर हे निर्णय घेण्यात येत आहेत, हे उघड आहे. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलचे दरात (Petrol Diesel Price) पण कपात करण्यात येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पेट्रोल-डिझेल खरंच होईल स्वस्त?

गेल्या एक वर्षांहून अधिका काळापासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताच बदल झालेला नाही. देशात पेट्रोल-डिझेलचा मोठा भडका उडाला होता. जनतेने रोष व्यक्त केल्यावर गेल्या वर्षी मे महिन्यात पेट्रोल-डिझेलवरील शुल्कात कपात करण्यात आली. काही राज्यांनी त्यांच्या मूल्यवर्धित करात कपात केली. त्यामुळे इंधनाचे भाव 10 ते 20 रुपयांनी कमी झाले. केंद्र सरकारने गेल्या वर्षी 22 मे रोजी उत्पादन शुल्क घटविले. काही राज्यांनी पण मूल्यवर्धित करात कपात केली. पण त्यानंतर आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी दरवाढ झाली नाही. गेल्या 11 महिन्यांपासून हा रेकॉर्ड अबाधित आहे.

या राज्यांत निवडणूका

देशात वर्षांच्या अखेरच्या टप्प्यात मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये निवडणुकांचे पडघम वाजतील. या राज्यात निवडणूक आयोग कामाला लागले आहे. निवडणुकांसाठी आतापासूनच तयारी सुरु झाली आहे. स्थानिक राज्य सरकारांनी पण सवलतींचा पाऊस पाडला आहे. या राज्यात सत्ता पालट होऊ नये यासाठी राज्य सरकार विविध सवलती देत आहे. त्यामुळेच पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपातीचा निर्णय होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

अशा वाढल्या किंमती

  1. 1 एप्रिल 2021 मध्ये गॅस सिलेंडरच्या किंमती 809 रुपये होत्या
  2. 1 एप्रिल 2022 मध्ये गॅस सिलेंडर 949.5 रुपयांना मिळत होते
  3. जुलै 2022 मध्ये एलपीजीची किंमत 1045 रुपयांवर पोहचली
  4. मार्च 2023 एलपीजीची किंमत 1103 रुपयांवर पोहचली

सबसिडीची थट्टा

गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारने एलपीजीवरील सबसिडी कमी केली. 2018-19 मध्ये 37,209 कोटी रुपये सबसिडी पोटी देण्यात आले होते. 2019-20 मध्ये एलपीजीवरील सबसिडी कमी होऊन ती 24,172 कोटी रुपये झाली. 2020-21 मध्ये 11,896 कोटी रुपये तर 2021-22 मध्ये 1,811 कोटी रुपयांवर सबसिडी येऊन ठेपली. आता ग्राहकांच्या खात्यात अवघे 3.75 रुपयांच्या जवळपास सबसिडी जमा होते.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत