AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price : कच्चा तेलाच्या किमतीत मोठी उसळण, आज भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव..

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असूनही, ७ जुलै रोजी IOCL आणि HPCL ने पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवले. अमेरिकन WTI आणि ब्रेंट क्रूड वाढले तरी भारतात इंधनाचे दर जैसे थे. यामुळे तेल कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. नायराने दर कमी केले असले तरी इतर कंपन्यांनी नाही. शेजारील देशांच्या तुलनेत भारताचे दर अजूनही स्थिर आहेत.

Petrol Diesel Price : कच्चा तेलाच्या किमतीत मोठी उसळण, आज भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव..
7 जुलै रोजी पेट्रोल- डिझेलचे दर किती ?
| Updated on: Jul 07, 2026 | 9:46 AM
Share

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना, IOCL आणि HPCL यांसारख्या सरकारी तेल विपणन कंपन्यांनी आज, ७ जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत; मात्र इंधनाच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. अमेरिकन WTI कच्च्या तेलाच्या दरात $०.४१ ची वाढ होऊन ते ६८.८३ डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचले आहे. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, ब्रेंट क्रूडच्या दरातही ०.४२ डॉलरची वाढ झाली असून ते ७२.२९ डॉलर्स प्रति बॅरल या दराने सध्या व्यवहार सुरू आहे. मात्र कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ झाल्यामुळे भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, कच्च्या तेलाच्या प्रति बॅरल किमतीत १० डॉलर्सची वाढ झाल्यास कंपन्यांना प्रति लिटर सुमारे ६ रुपयांचे नुकसान सोसावे लागते. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या मते, ऑईल मार्केटिंग कंपन्यांना अजूनही मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे.

नायरानंतर कोणीही घटवले नाहीत पेट्रोलचे दर

युद्धादरम्यान कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या असताना, भारतात ‘नयारा’ (Nayara) ही पहिली कंपनी होती जिने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ५ रुपये आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ केली. त्यानंतर मे महिन्यात, सरकारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या दरात प्रति लिटर ७.५० रुपयांची वाढ केली. सध्या इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता चर्चा सुरू आहे; युद्धविराम लागू आहे आणि कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १२६ डॉलर्सवरून घसरून ७२-७३ डॉलर्सच्या दरम्यान पोहोचल्या आहेत.

‘नायरा’ने दर कमी केल्यानंतर भारतातील इतर कोणत्याही कंपनीने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केलेले नाहीत. बंगळुरू येथील ‘नयारा’च्या पंपांवर प्रति लिटर ५ रुपयांची कपात होऊनही, तिथे पेट्रोलचा दर १११.२० रुपये आणि डिझेलचा दर ९८.८० रुपये प्रति लिटर इतका आहे. याउलट, आज (७ जुलै) ‘इंडियन ऑइल’च्या पंपांवर डिझेलचा दर ९८.८० रुपये आणि पेट्रोलचा दर ११०.९१ रुपये प्रति लिटर आहे.

शेजारच्या देशांमध्ये किती आहेत भाव ?

GlobalPetrolPrices.com च्या आकडेवारीनुसार, भारताच्या शेजारच्या देशांमधील पेट्रोल – डिझेलचे दर जाणून घेऊया. चीनमध्ये इंधनाचे दर १५.६ टक्क्यांनी अधिक आहेत; तर पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे १६ टक्के आणि १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या सर्व देशांमध्ये इंधनाचे दर युद्धापूर्वीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या जास्त आहेत, याउलट भारतात मात्र दरांमध्ये केवळ ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

तर म्यानमारमध्ये पेट्रोल अजूनही युद्धापूर्वीच्या दराच्या दीडपट दराने विकले जात आहे आणि डिझेल ४३.७ टक्क्यांनी महाग आहे. नेपाळमध्ये पेट्रोल ३८.२ टक्क्यांनी आणि डिझेल ५८.५ टक्क्यांनी महाग आहे. बांगलादेशात सध्या पेट्रोलचे दर २०.८ टक्क्यांनी अधिक आहेत आणि डिझेलच्या दरात १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. श्रीलंकेत पेट्रोल ४५.६ टक्क्यांनी आणि डिझेल ४८ टक्क्यांनी महाग आहे.

आज सरकारी पंपांवर पेट्रोल-डिझेलचे दर किती ?

जयपुरमध्ये पेट्रोल ११२.६६ रुपये आणि डिझेल ९७.७८ रुपये प्रति लिटर

दिल्लीत पेट्रोलचा दर १०२.१२ रुपये प्रति लिटर असून डिझेल ९५.२० रुपये प्रति लिटर अशा दराने मिळत आहे.

पाटणा: पेट्रोल ११२.७० रुपये आणि डिझेल ९९.८७ रुपये प्रति लिटर

लखनऊ: पेट्रोलचा दर १०२.०५ रुपये असून डिझेल ९९.२८ रुपये मोजावे लागत आहेत.

भोपाळ: पेट्रोल ११४.६५ रुपये दराने आणि डिझेल ९९.७४ रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे.

अयोध्या : पेट्रोल १०२.४० रुपये आणि डिझेल ९७.८७ रुपये प्रति लिटर

चेन्नई: पेट्रोल १०७.७७ रुपये आणि डिझेल ९९.५५ रुपये प्रति लिटर

इंदूर: पेट्रोल ११४.६१ रुपये आणि डिझेल ९९.७० रुपये प्रति लिटर

कोलकाता: पेट्रोल ११३.५१ रुपये असून डिझेलसाठी ९९.८२ रुपये भरावे लागत आहेत.

मुंबई: पेट्रोलची किंमत १११.२१ रुपये असून 1 लिटर डिझेल ९७.८३ हे रुपये इतक्या भावाने मिळत आहे.

स्रोत: इंडियन ऑRल

Follow Us
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी